एक लाख शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 02:59 PM2020-02-07T14:59:49+5:302020-02-07T14:59:55+5:30
६ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६ हजार शेतकºयांच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये गुरुवार, ६ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६ हजार शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया १ फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आली असून, गुरुवार, ६ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६ हजार शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यापारी बँकांच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे.