उरळ पोलिसांची नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:17 AM2021-04-19T04:17:29+5:302021-04-19T04:17:29+5:30

कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यात संचारबंदी घोषित केली; मात्र नागरिक बेफिकिर असल्याचे दिसून ...

Ural police take action against violators | उरळ पोलिसांची नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई

उरळ पोलिसांची नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई

Next

कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यात संचारबंदी घोषित केली; मात्र नागरिक बेफिकिर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस रस्त्यावर उतरून धडक कारवाई करीत आहेत. उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र मोरे, हे.काॅ. अनिल येन्नेवार, पो.काॅ.हरीहर इंगळे, चालक कांताराम तांबडे यांनी रस्त्यावर उतरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सूरू ठेवून संचारबंदी नियमांचे ऊल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये निमकर्दा येथील मंगेश देवीदास खेडकर, महेश वासुदेव खेडकर, गौरव अशोक उमाळे तर गायगाव येथील प्रशांत अरूण मगर, गजानन बाबूराव ननावरे या सर्व दुकानदारांवर भादंवीच्या कलम १८८, २६९ नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका ऑटोवर व ट्रीपल सिट प्रवास करणाऱ्या दोन दुचाकींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. निंबा फाटा येथे विनामास्क फिरणाऱ्या नऊ जणांवर कारवाई करण्यात आली.

Web Title: Ural police take action against violators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.