पातूर येथील साहित्यिकाने गाजविला अकोला येथील उर्दू मुशायरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:11 AM2021-02-05T06:11:49+5:302021-02-05T06:11:49+5:30
कार्यक्रमाचे अध्यक्ष रफिकशाद नदवी दोहा कथर होते. प्रमुख अतिथी म्हणून फजलू पहेलवान, मुस्तफा पहेलवान, अफसर कुरेशी, अतुल भालतिलक, साहित्यिक ...
कार्यक्रमाचे अध्यक्ष रफिकशाद नदवी दोहा कथर होते. प्रमुख अतिथी म्हणून फजलू पहेलवान, मुस्तफा पहेलवान, अफसर कुरेशी, अतुल भालतिलक, साहित्यिक देवानंद गहिले, माजी प्राचार्य उस्मान आजाद उर्दू हायस्कूल फशीहुल्ला खान होते. या मुशायरामध्ये एकापेक्षा एक अशी मुशायरी सादर करण्यात आली. पातूर येथील मराठी तथा हिंदी साहित्यिक देवानंद गहिले यांनी कफन बेवफाई का शायरी सादर करून दाद मिळविली. यावेळी पातूरच्या देवानंद गहिले यांना ‘नैतिकतेचे प्रतीक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी फसीहुल्ला खान नकीब, रउफ अंजुम ,हुसेन खान झंझट, गुलाब जखमी, जमीर अहमद जमीर ,डॉ. उरूज अहमद ,डॉ.साबिर कमाल ,शहजाद अन्वर खान, सलीम सहर ,सैईदोद्दीन नवाब, सईद खान सईद ,इरफान जफर, दावर नवेद, अनस नबील, इमरान सानी, कलीम शादाब,असद ताबिश, इस्माईल अता, इजहार रशीद, सिराज आलम, मुजतबा हुसेन, लतीफ फानी, इरशाद हैदर, डॉ. इजहार जहीर आदींनी मुशायरी सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सूत्रसंचालन जमीर अहमद जमीर यांनी केले. आभार सईद खान सइद यांनी मानले.
फोटो: