‘एमआयएम’च्या होर्डिंग्जवर उर्दू शाळेचा पत्ता
By Admin | Published: January 8, 2017 02:36 AM2017-01-08T02:36:28+5:302017-01-08T02:36:28+5:30
कार्यालय शोधताना इच्छुकांची दमछाक.
अकोला, दि. ७- महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. मनपाची निवडणूक पहिल्यांदाच स्वबळावर लढणार्या ह्यएमआयएमह्ण पक्षाने शहरात लावलेले होर्डिंग्ज चर्चेचा विषय ठरले आहेत. इच्छुकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी चक्क जिल्हा परिषदेच्या उर्दू मुलींच्या शाळेचा पत्ता दर्शविल्याने पक्षाचे कार्यालय शोधताना इच्छुकांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी बाह्या वर खोचल्या आहेत. तूर्तास युती किंवा आघाडीची शक्यता फेटाळून लावत राजकीय पक्षांनी ह्यएकला चलो रेह्णची भूमिका घेतल्याचे दिसून येते. नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाने युती तर काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले. भारिप-बहुजन महासंघाने एमआयएमसोबत बाळापूर नगरपालिके तील तीन जागा वगळता इतर ठिकाणी स्वतंत्ररीत्या उमेदवार उभे केल्याचे चित्र होते. अर्थातच, प्रत्येक राजकीय पक्षांनी स्वत:ची ताकद अजमावल्याचे समोर आले. नगरपालिका निवडणुकीत ह्यएमआयएमह्णच्या पदरी निराशा आली असली, तरी महापालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार असल्याचे संकेत पक्षाचे महानगराध्यक्ष जमील खान यांनी दिले आहेत. इच्छुकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी एमआयएमच्यावतीने जुने शहरात पक्ष कार्यालय सुरू करण्यात आले. त्याची माहिती देण्यासाठी शहरात भले मोठे होर्डिंग्ज उभारण्यात आले. या धावपळीत होर्डिंग्जवर पक्ष कार्यालयाऐवजी चक्क जिल्हा परिषद उर्दू मुलींच्या शाळेचा पत्ता दर्शविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीला अनेक इच्छुकांनी थेट उर्दू शाळा गाठली. कार्यालय शोधताना इच्छुकांची दमछाक होत असल्याची खमंग चर्चा शहरात सुरू आहे.
मुस्लीम-दलितबहुल प्रभागांवर लक्ष
महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच स्वबळावर लढणार्या ह्यएमआयएमह्णने शहरातील मुस्लीम-दलितबहुल भागावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. प्रभागांची पुनर्रचना होऊन त्याचे अवाढव्य क्षेत्रफळ व लोकसंख्या वाढल्याने एमआयएमकडून मुस्लीम व दलित असा प्रयोग होण्याची दाट चिन्हं आहेत. हा प्रयोग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बमसंसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
आम्ही अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली असून, १४ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत आहे. होर्डिंग्जवर पक्ष कार्यालयाचा पत्ता टाकणे अपेक्षित होते. तांत्रिक चूक झाली असून, त्यामध्ये तातडीने दुरुस्ती केली जाईल.
-जमील खान,
महानगराध्यक्ष एमआयएम.