अकोला जिल्ह्यातील उर्दू शिक्षकांना मिळणार मूल्यवर्धनाचे धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 01:00 PM2018-11-23T13:00:15+5:302018-11-23T13:01:14+5:30
अकोला: शालेय स्तरावर मुलांना शिक्षण, शिस्त, संस्कार देण्यासोबतच त्यांना सुजाण नागरिक घडविण्याच्या दृष्टिकोनातून शांतीलाल मुथ्था फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील मराठी शाळा व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धनाचे धडे देण्यात येणार आहेत.
- नितीन गव्हाळे
अकोला: शालेय स्तरावर मुलांना शिक्षण, शिस्त, संस्कार देण्यासोबतच त्यांना सुजाण नागरिक घडविण्याच्या दृष्टिकोनातून शांतीलाल मुथ्था फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील मराठी शाळा व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धनाचे धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी अकोला जिल्ह्यातील मराठी शिक्षकांनंतर आता १४१ शाळांमधील उर्दू शिक्षकांना मूल्यवर्धनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
बालवयातच मुलांवर योग्य संस्कार होतात. घरातील आईनंतर शिक्षक हे मुलांना घडवितात. घरानंतर मुले सर्वाधिक काळ शाळेत घालवितात. त्यामुळे मुलांवर संस्कार करण्याची, त्यांच्या बुद्धिमत्तेला, व्यक्तिमत्त्वाला चालना देण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर असते. मुलांना घडविण्यात शिक्षक कुठेही कमी पडू नये, या दृष्टिकोनातून शांतीलाल मुथ्था फाउंडेशन व राज्य शासनाच्यावतीने राज्यातील प्राथमिक मराठी व उर्दू शाळांसाठी मूल्यवर्धनाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यात १९ सुलभकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता त्यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर, तालुका आणि केंद्र स्तरावर जिल्ह्यातील १४१ जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका उर्दू शाळांमधील ४९0 शिक्षकांना मूल्यवर्धनासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची पुस्तकेसुद्धा उपलब्ध करण्यात आली आहेत. लवकरच या प्रशिक्षणाला सुरुवात होईल. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना मूल्यवर्धनाचे धडे देण्याच्या दृष्टिकोनातून उर्दू शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लवकरच १४१ उर्दू शाळांमधील ४९0 शिक्षकांना मूल्यवर्धनसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी पुस्तकेसुद्धा उपलब्ध झाली आहेत.
- मोहम्मद वसिम,
जिल्हा समन्वयक, मूल्यवर्धन.