विदर्भात बनावट कीटकनाशकांचा वापर वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:42 PM2018-08-28T14:42:20+5:302018-08-28T14:43:33+5:30

अकोला : कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर पिके जळाल्याच्या घटना विदर्भात समोर येत असून, अकोला जिल्ह्यात कपाशीचे पीक जळाल्याने बोगस कीटकनाशकांचा वापर होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

 Use of fake insecticides in Vidarbha increased! | विदर्भात बनावट कीटकनाशकांचा वापर वाढला!

विदर्भात बनावट कीटकनाशकांचा वापर वाढला!

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाने ठरवून दिलेल्या यादींच्या व्यतिरिक्त कीटकनाशकांची विक्री होत असल्याने हे प्रकार घडत असल्याचे वृत्त आहे.कीटकनाशकांची फवारणी करताना जीवितहानी होऊ नये, यासाठीची जनजागृती करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते.

अकोला : कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर पिके जळाल्याच्या घटना विदर्भात समोर येत असून, अकोला जिल्ह्यात कपाशीचे पीक जळाल्याने बोगस कीटकनाशकांचा वापर होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, शासनाने ठरवून दिलेल्या यादींच्या व्यतिरिक्त कीटकनाशकांची विक्री होत असल्याने हे प्रकार घडत असल्याचे वृत्त आहे.
मागील वर्षी खरीप हंगामात कीटकनाशकांची हाताळणी करताना शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याच्या घटना विदर्भात घडल्याने शासनाने याची गंभीर दखल घेत कीटकनाशकांची फवारणी करताना जीवितहानी होऊ नये, यासाठीची जनजागृती करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. कृषी विभागाने याबाबत जनजागृती मोहीम राबविली. यावर्षी मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. पावसाची अनिश्चितता, वातावरणातील बदलामुळे यावर्षीही कपाशीवर बोंडअळी, रसशोषण करणाºया किडीने आक्रमण केले. सोयाबीनवर स्पोडोप्टेरा, चक्रीभूंगा आदी किडींनी हल्ला केला. या किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेकडो शेतकरी कृषी केंद्रांमधून विविध प्रकारची कीटकनाशके खरेदी करीत आहेत.
शासनाने यावर्षी जिल्हानिहाय नोंदणीकृत व शिफारस केलेल्या कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्याचे धोरण जाहीर केले. या धोरणानुसारच कीटकनाशकांची यादी राज्याच्या कृषी आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठविली. असे असताना यादीबाहेरील कीटकनाशके येतात कशी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.
- गावातीलच साडेतीन एकर शेत ठोक्याने केले. कपाशीची लागवड करून भरघोस उत्पन्न घेण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पीकही जोमदार आले; परंतु कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर साडेतीन एकरातील कपाशी करपली.
रूपेश लासुरकार,
शेतकरी,अकोली रू पराव, जिल्हा अकोला.
- कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द!
दरम्यान, चुकीची औषधे आदींसंदर्भात विभागीय
गुण नियंत्रण
विभागाने चौकशी करू न कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील १४ केंद्रांचा समावेश असून, वाशिम जिल्ह्यातील पाच केंद्र यामध्ये आहेत. अकोला जिल्ह्यातील ५६ कृषी सेवा केंद्रे या यादीत असून, एका केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
- कापूस जळाल्याने शेतकºयांनी तातडीने पंचायत समिती कृषी अधिकाºयांकडे तक्रारी कराव्यात, जिल्ह्यातील आपातापा येथील पिकाचे तणनाशक फवारल्यानंतर नुकसान झाले. या शेताची तज्ज्ञांकरवी पाहणी केली आहे. लवकरच अहवाल येईल.
नरेंद्र शास्त्री,
कृषी अधिकारी, अकोला.

 

Web Title:  Use of fake insecticides in Vidarbha increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.