क्रिकेट सट्टय़ाकरिता बनावट सिमकार्डचा वापर !

By admin | Published: June 22, 2016 01:00 AM2016-06-22T01:00:01+5:302016-06-22T01:00:01+5:30

आकोटमधील नरेश भुतडाविरुद्ध चौथा गुन्हा दाखल

Use of fake SIM card for cricket stand! | क्रिकेट सट्टय़ाकरिता बनावट सिमकार्डचा वापर !

क्रिकेट सट्टय़ाकरिता बनावट सिमकार्डचा वापर !

Next

अकोला/आकोट: आकोट येथील क्रिकेट सट्टय़ाकरिता वापरण्यात आलेले सिमकार्ड बोगस दस्तावेजाद्वारे मिळविल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी आरोपी नरेश भुतडासह सहा जणांविरुद्ध २१ जून रोजी आकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तपासाअंती अकोला येथील दहशतवाद विरोधी कक्ष (एटीसी) ने भुतडाविरुद्ध हा चौथा गुन्हा दाखल केला.
नागपूर येथील फिर्यादी सुनील मूलचंद मनवानी यांची कागदपत्रे तयार करून स्वत:च्या फायद्यासाठी त्यांच्या कागदपत्रांचा नवीन सिमकार्ड घेण्यासाठी वापर करण्यात आल्याची तक्रार २१ एप्रिल रोजी आकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून आरोपी नरेश लक्ष्मीनारायण भुतडा, श्याम मधुकर कडू, चेतन महेश जोशी, वीरेंद्र दर्यावसिंह रघुवंशी (सर्व रा. आकोट), नागपूर येथील रिलायन्स कंपनीचा किरकोळ विक्रेता निलेश अ. अछपीला तसेच वितरक राजगुरू डिस्ट्रीब्युटरचा मालक अशा सहा जणांविरुद्ध भादंविच्या कलम ४२0 ( फसवणूक), ४६८, ४७१ (खोटे दस्तऐवज तयार करणे व खरे असल्याचे भासविणे), ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी केली. 

बोगस सिमकार्ड घटनेची पार्श्‍वभूमी
लोहारी रोडवरील एमआयडीसीमधील योगिराज ऑइल मिलमध्ये १९ मार्च रोजी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा घेतला जात असताना, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने छापा घातला होता. यामध्ये कलम ४,५ मुंबई जुगार अँक्टनुसार गुन्हा दाखल करून नरेश भुतडासह चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून २४ मोबाइलचा सेट, लॅपटॉप, संगणक, हॉटलाइनसाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. या साहित्याच्या आधारे तपासात माहिती संकलित करण्यात येत असून, बोगस सिमकार्ड तयार केल्याचे उघडकीस येत असल्याने गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

भुतडाचा अवैध व्यवसाय पोलिसांच्या 'रडार'वर
भुतडाच्या अवैध व्यवसायाचे साम्राज्य पोलिसांच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे.गत अनेक वर्षांपासून आकोट शहरात बस्तान मांडून असलेल्या अवैध धंद्यांचा बिमोड जिल्हा पोलीस यंत्रणा करीत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले अनेक मोठे अवैध धंदे छोट्या शहरात सुरू असल्याचे उघडकीस येत असल्याची पोलिसांची माहिती आहे. क्रिकेट सट्टाप्रकरणी नरेश भुतडाविरुद्ध मंगळवारी चौथा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Use of fake SIM card for cricket stand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.