कृषी क्षेत्रात गणितीय आकडेमोडीचा वापर!

By admin | Published: March 18, 2015 01:19 AM2015-03-18T01:19:43+5:302015-03-18T01:19:43+5:30

संशोधनाला येणार गती; ‘मॅटलॅब’ सॉफ्टवेअरबाबत मार्गदर्शन.

Use of mathematical calculations in the field of agriculture! | कृषी क्षेत्रात गणितीय आकडेमोडीचा वापर!

कृषी क्षेत्रात गणितीय आकडेमोडीचा वापर!

Next

अकोला : आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी गणितीय आकडेमोडीचा वापर आता कृषिक्षेत्रात करण्यास सुरुवात झाली आहे. कृषी संशोधनाला गती देण्यासाठी गणितीय आकडेमोडीशी संबधित ह्यमॅटलॅबह्ण सॉफ्टवेअरचा उपयोग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरू केला आहे. याकरिता कृषी शास्त्रज्ञ, विद्यार्थ्यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कृषी अभियांत्रिकीच्या एम.टेक., पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना प्रकल्प तयार करण्यासाठी गणितीय पद्धतीचा वापर करावा लागतो. कृषी शास्त्रज्ञांना संशोधनासाठी याच पद्धतीचा अवलंब करणे क्रमप्राप्त असते. तथापि, पारंपरिक पद्धतीत शास्त्रीय आकडेमोड काढताना शास्त्रज्ञांना कधी कधी एक वर्ष विलंब लागतो. या सॉफ्टवेअरमुळे मात्र अवघ्या काही तासांत ही गणितीय आकडेमोड काढता येईल. म्हणजेच संशोधनाचं पृथ:करण, विश्लेषण करणे सोपे झाले आहे. कृषिक्षेत्रात या सॉफ्टवेअरचा वापर करणे अनिवार्य असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाने कृषी शास्त्रज्ञांसाठी पाच दिवसांचा प्रशिक्षण वर्ग घेतला आहे. हे प्रशिक्षण या विषयात पारंगत असलेले तज्ज्ञ हे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, विद्यार्थ्यांना देत आहेत. या संदर्भात डीफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट आर्गनायजेशन, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गिते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संशोधनाचा डाटा संग्रह करणे, तो हाताळणे या सॉफ्टवेअरमुळे सोपे झाले असून, शास्त्रज्ञाना संशोधन करताना ग्राफ, आकृती आदी कामे करणे सोपे झाले असल्याचे सांगीतले. *कृषी विद्यापीठाने कशावर केला वापर? कृषी विद्यापीठाने रेनवॉटर हार्वेस्टिंग, कृषी प्रक्रिया, कृषी उत्पादन आणि उत्पन्न, पाणलोट क्षेत्रविकास आदी विषयांवर काम केले असून, सॉफ्टवेअरमुळे या कामासाठी लागणार्‍या वेळेची बचत झाली आहे.

Web Title: Use of mathematical calculations in the field of agriculture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.