पिकांवर आता ‘नॅनो टेक्नालॉजी’चा वापर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 06:51 PM2020-01-28T18:51:54+5:302020-01-28T18:52:11+5:30
या तंत्रज्ञानाचा वापर करू न संत्रा फळावरील डिंक्या रोगावर प्रभावी व्यवस्थापन होऊ शकते असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
अकोला : कृषी क्षेत्रात आता ‘नॅनो टेक्नालॉजी’चा वापर वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून, जैव किटकनाशकांचा प्रभाव कायम राहण्यासाठीचे संशोधन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करू न संत्रा फळावरील डिंक्या रोगावर प्रभावी व्यवस्थापन होऊ शकते असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
आता जैवतंत्रज्ञानाचा वापर करू नच कृषी क्षेत्रात प्रगती साधण्यासाठीचे पाऊल कृषी संस्था,विद्यापीठांनी उचलेले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात यासाठी स्वतंत्र संशोधन सुरू करण्यात आले आहे. येथे शेवगा वृक्षाच्या पानापासून ‘झींक नॅनो पार्टीकल’ संशोधन करण्यात आले असून, हे पार्टीकल वापरू न जैव किटनाशकांचा अतिनिल किरणांमुळे कमी होणारा प्रभाव रोखण्याचे यशस्वीरित्या काम करते.त्यामुळे एखाद्या पिकांवर जर किड,रोगांवर जैव किटकनाश फवारले असेल तर प्रभाव जास्त काळ टिकून राहतो.परिणामी किड,रोगांचे यशस्वी व्यवस्थापन होऊन उत्पादनात वाढ होते.आजमितीस पिकांवर फवारलेल्या किटकनाशकांचा प्रभाव जास्त काळ राहत नाही.नॅनो पार्टीकल चा वापर केल्यास जैव किटकनाशकांचा प्रभाव दिर्घकाळ टिकून राहतो. तसेच अतिरिक्त दुष्परिणाम थांबविता येतो. शेवगा वृक्षाच्या पानापासून बनविलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर सर्वच पिकांसाठी करता येईन हे विशेष.
विदर्भात संत्र्याचे क्षेत्र एक लाख २५ हजार हेक्टरवर आहे.यावर डिंक्यासारखा रोग होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. उपाययोजना करताना शेतकऱ्यांचा खर्च खूप वाढतो.म्हणूनच हा डिंक्या रोखण्यासाठी ‘कॉपर नॅनो पार्टीकल’ वापर करण्यात आले आहे. यावर संध्या संशोधन सुरू आहे. त्यातून चांगले निकाल,निष्कर्ष निघाले आहेत. पंरतु हे संशोधन अद्याप पूर्ण व्हायचे आहे.एकूणच येणारी शेती आता ‘नॅनो टेक्नालॉजी’वर आधारित असेल असा शास्त्रज्ञाचा दावा आहे.
नॅनो टेक्नालॉजी चा वापर करू न पिकावरील जैवकिटकनाशकांचा प्रभाव अधिक टिकून राहाते परिणामी किडीचे व्यवस्थापन होवून उत्पादन वाढीस मदत होते.संत्र्यावरील डिंक्या रोगाचेदेखील यशस्वी व्यवस्थापन होईल.परंतु सद्या यावर संशोधन सुरू आहे.
- डॉ.एम.पी.मोहरील,
जैवतंत्रज्ञान,शास्त्रज्ञ,
डॉ.पंदेकृवि,अकोला.