‘जलकुं भी’ नियंत्रणासाठी किडींचा वापर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 02:25 AM2018-02-03T02:25:57+5:302018-02-03T02:27:01+5:30
अकोला : प्राणवायू, जलचर प्राण्यांसाठी घातक ठरलेल्या जलकुंभी या तणवर्गीय वनस्पतीचा प्रसार झपाट्याने होत असून, आजमितीस देशातील ४ लाख हेक्टर पाण्यावर विस्तार झाला आहे. या वनस्पतीच्या नियंत्रणासाठी अखेर ‘फ्लोरीडी’ ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात आली आहे. आयात केलेल्या या किडींवर जबलपूर येथील राष्ट्रीय तणव्यवस्थापन विज्ञान केंद्रात संशोधन केल्यानंतर देशातील ‘जलकुंभी’वर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
राजरत्न सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्राणवायू, जलचर प्राण्यांसाठी घातक ठरलेल्या जलकुंभी या तणवर्गीय वनस्पतीचा प्रसार झपाट्याने होत असून, आजमितीस देशातील ४ लाख हेक्टर पाण्यावर विस्तार झाला आहे. या वनस्पतीच्या नियंत्रणासाठी अखेर ‘फ्लोरीडी’ ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात आली आहे. आयात केलेल्या या किडींवर जबलपूर येथील राष्ट्रीय तणव्यवस्थापन विज्ञान केंद्रात संशोधन केल्यानंतर देशातील ‘जलकुंभी’वर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
जलकुंभीचं मूळ ब्राझील आहे. ही युरोप वगळता सर्व जगात पसरली. भारतात, एकोणावीसशेच्या दशकात सर्वप्रथम कोलकोता येथे फुलांचे झाड म्हणून आणलेल्या या तणवर्गीय वनस्पतीचा देशात विस्तार झाला. पाण्यातील प्राणवायू आणि जलचर प्राण्यांसाठी घातक ठरणारी ही जलकुंभी आता डोकेदुखी ठरू लागल्याने या तणाच्या नियंत्रणासाठी १९८२ मध्ये फ्लोरीडा आणि आस्ट्रेलियातून नियोकोटीना आणि नि. बुकी (कोलीयोप्टरा, कुरकुलीयोनीडी)या दोन जातीच्या किडींची बंगरू ळ येथे आयात करण्यात आली . १९८५ मध्ये या माइट प्रजातींना बाहेरच्या वातावरणात सोडण्याची अनुमती देण्यात आली. या किडींनी जलकुंभीवर जैविकरीत्या नियंत्रण मिळविले आहे. या अगोदर आस्ट्रेलिया, अमेरिका व सुडान या देशात सोडण्यात आलेल्या ‘माइट’ ने जलकुंभीवर नियंत्रण मिळविले. ही कीड पाने कुरतळून खाते.
उष्णकटीबंधीय देशात स्वतंत्रपणे पाण्यात तरंगणारी ही तणवर्गीय वनस्पती आहे.‘आइकोर्निया क्रेसीपस’ वैज्ञानिक नाव असलेल्या वनस्पतीला हिंदी व प्रादेशिक भाषेत जलकुं भी, पटपटा व समुद्र सोख या नावाने ओळखले जाते. या वनस्पतीमुळे पाण्यातील प्राणवायू कमी होत असून, मासे व इतर जलचर प्राण्यांसाठी अत्यंत घातक ठरत आहे. २0 ते ४0 टक्के पाण्याचा प्रवाह यामुळे कमी होतो. बाष्पिभवनाचा वेगही ३ ते ८ टक्के वाढल्याचे निष्कर्ष संशोधनात समोर आले आहेत. या पृष्ठभूमीवर जबलपूर येथील विज्ञान केंद्रात संशोधन केल्यानंतर सात ते आठ वर्षांपूर्वी तेथील जलाशयात या किडींना सोडण्यात आले होते. आता या किडींनी पूर्ण जलकु ंभीवर नियंत्रण मिळविले, तसेच मणिपूर, बंगरू ळू आणि हैद्राबाद आदी शहरातील जलकुंभी या किडींद्वारे नियंत्रित करण्यात आली.
उत्पादनाची क्षमता जलद
जलकुंभीचे एक झाड पाच पाच हजार बियाणे निर्माण करते. हे बियाणे मातीत अनेक वर्ष दबून राहतात. अनुकूल परिस्थिती निर्माण होताच पुन्हा डोके वर काढतात. मूळ झाडापासून तुटलेल्या फांदय़ा दुसरे झाड तयार करतात. १0 ते १२ दिवसात जलकुंभींची संख्या दुप्पट होते.
रासायनिक फवारणी
२-४ डी, ग्लाईफोसेट व पेराक्वाट या रासायनिक औषधांद्वारे फवारणी करू नही जलकुंभीवर नियंत्रण मिळवता येते; परंतु आपल्याकडे फवारणी महागडी असल्याने ते शक्य नाही.
जलकुंभीवर कीड प्रभावी नियंत्रण मिळवत असून, देशात सर्वत्र वापर होत आहे.
- डॉ. सुशीलकुमार,
वरिष्ठ शास्त्रज्ञ,
राष्ट्रीय तणव्यवस्थापन विज्ञान संशोधन केंद्र, जबलपूर,(एम.पी.).