शरद पवारांच्या सभेत प्लास्टिकचा वापर ; राष्ट्रवादीला १० हजाराचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:36 PM2019-10-11T12:36:34+5:302019-10-11T14:12:35+5:30
प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला नगरपालिकेने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मूर्तिजापूर : येथील गाडगे महाराज विद्यालयाचे प्रांगणात राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे ९ आॅक्टोबर रोजी शरद पवार यांची जाहीर जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला नगरपालिकेने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रचारासाठी ९ आॅक्टोबर रोजी दुपारी शरद पवार यांनी जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेला प्रचंड जनसमुदाय जमला होता. जमलेल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आली होती. पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या ग्लॉसचा वापर करण्यात आला होता. सभा संपल्यानंतर प्रांगणात प्लास्टिक ग्लॉसचा मोठा खच साचला होता. या सभते प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे लक्षात आल्यानंत स्थानिक नगरपालिकेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर १० आॅक्टोबर रोजी १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
ज्या व्यापाऱ्याने अथवा दुकानदारांने या प्लास्टिक ग्लॉसचा संबधित सभेसाठी पुरवठा केला आहे त्याचा शोध घेऊन त्यांचेवर पण दंडात्मक कारवाई करणार
- विजय लोहकरे
मुख्याधिकारी, नगर परिषद, मूर्तिजापूर