‘यूरिया’चा वापर वाढण्याची शक्यता; उत्पादनावर परिणाम होण्याची भीती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:18 AM2021-04-11T04:18:25+5:302021-04-11T04:18:25+5:30
अकोला: संयुक्त आणि मिश्र खतांच्या दरांत प्रती बॅग ६०० ते ७०० रुपयेप्रमाणे वाढ करण्यात आली असून, यूरिया खताचे दर ...
अकोला: संयुक्त आणि मिश्र खतांच्या दरांत प्रती बॅग ६०० ते ७०० रुपयेप्रमाणे वाढ करण्यात आली असून, यूरिया खताचे दर स्थिर आहेत. त्यामुळे येत्या खरीप हंगामात पिकांसाठी शेतकऱ्यांकडून यूरिया खताच्या वापरात वाढ होण्याची शक्यता आहे; मात्र केवळ यूरियाचा वापर केल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संयुक्त आणि मिश्र खतांच्या दरांत प्रती बॅग (५० किलो) ६०० ते ७०० रुपयांची वाढ केंद्र शासनामार्फत करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून संयुक्त आणि मिश्र खतांच्या दरांत वाढ करण्यात आली असून, यूरिया खताचे दर प्रती बॅग २६६ रुपये कायम ठेवण्यात आले. संयुक्त आणि मिश्र खतांच्या दरांत वाढ करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. संयुक्त आणि मिश्र खतांच्या दरांत वाढ करण्यात आल्याने, येत्या खरीप हंगामात कमी मिळणाऱ्या केवळ यूरिया खताचा पिकांसाठी वापर वाढण्याची शक्यता आहे. केवळ यूरिया खताचा वापर केल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संयुक्त व मिश्र खतांचे दर वाढले असले तरी, केवळ यूरिया खताचा वापर केल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांसाठी नत्र, स्फूरद, पलाश इत्यादी घटकांचा वापर करावा. केवळ यूरिया खताचा वापर करु नये.
शंकर तोटावार
प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.