मानव कल्याणासाठी उपयोगी संशोधन करावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 01:55 AM2017-03-11T01:55:54+5:302017-03-11T01:55:54+5:30
राष्ट्रीय पेपर पोस्टर व प्रकल्प मॉडेल स्पर्धेचे उद्घाटन; अरुण शेळके यांचे आवाहन.
अकोला, दि. १0- पर्यावरणीय असंतुलनामुळे जगासमोर नवे संकट उभे राहत आहे. प्लास्टिकच्या अति वापरामुळे विघटित न होणारे खत निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत अभियांत्रिकी व तांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी रचनात्मक व मानव कल्याणासाठी उपयोगी पडणारे संशोधन करून वसुंधरेचा विकास साधावा, असे आवाहन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड .अरुण शेळके यांनी केले.
बाभूळगाव परिसरातील श्री शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात केमिकल इंजिनियरिंग विभाग व इंडियन प्लास्टिक इन्स्टिट्यूटच्यावतीने ह्यकेम प्रो २ के १७ह्ण या अभियांत्रिकी व तांत्रिकी विषयातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पेपर पोस्टर व प्रकल्प मॉडेल स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी अँड .शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाच्या विश्वेश्वरैया सभागृहातील या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, पुणे येथील जॉन डियरचे ज्येष्ठ तंत्रज्ञ सचिन अवताडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .के .देशमुख, केमिकल शाखा विभाग प्रमुख डॉ. पी .व्ही .थोरात, केम प्रो २ के १७ स्पर्धेचे समन्वयक डॉ. एस एन नेमाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ज्येष्ठ तंत्रज्ञ व भारत सरकारचा उत्कृष्ट तंत्रज्ञ पुरस्कार प्राप्त सचिन अवताडे यांचा प्रा.धनंजय साकारकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रास्ताविक डॉ. पी. व्ही. थोरात, संचालन प्रा. गोपाळ झांबरे, तर आभार डॉ. एस. एन. नेमाडे यांनी मानले. यावेळी नरेश जैन, दिलीप पाटील, सुनील घोडके, विलास देशमुख , प्रा. आर. एस. जाधव, प्रा. एस. एस. तायडे, प्रा. वेले, प्रा.डी. सी. कोठारी, प्रा. एस. व्ही. खोडकर, प्रा. ए .पी गावंडे, प्रो. डी. पी. साकारकर, डॉ. मीना जवादे, शुभम नागपुरे, पूजा मुदलियार यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत ८२ मॉडेल
राष्ट्रीय पातळीवर विविध महाविद्यालयातून या राष्ट्रीय स्पर्धेत विविध श्रेणीतील ८२ पेपर पोस्टर व मॉडेल प्राप्त झाले. त्यांचे परीक्षण परीक्षक आर्वी येथील डॉ. निनाद जावडे, अमरावती येथील प्रा. डी. आर. गावंडे, उद्योजक के. बी. गोरालिया, प्रा. संजय मकवाना, प्रा. श्रीकांत सातारकर, प्रा. एस. के. पाटील यांनी केले.