पिंजर येथे पशू रुग्णालयात पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:18 AM2021-04-11T04:18:12+5:302021-04-11T04:18:12+5:30
--------------------------------------- बांधकामाचे साहित्य महागल्याने सर्वसामान्यांना फटका बाळापूर : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास ३० टक्के वाढ केली आहे, ...
---------------------------------------
बांधकामाचे साहित्य महागल्याने सर्वसामान्यांना फटका
बाळापूर : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास ३० टक्के वाढ केली आहे, तसेच लोखंडाचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांमधून होत आहे.
------------------------------------
जलसाठे आटले; वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
म्हातोडी : वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जंगलातील जलसाठे आटल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाण्याच्या शोधात माकडे गावात धाव घेत आहेत. म्हातोडी परिसरातील घुसर, घुसरवाडी येथे माकडांनी उच्छाद मांडला आहे.
-----------------------
उन्हाळी शिबिराला कोरोनाचा फटका
अकोट : एप्रिल किंवा मे मध्ये १० ते १५ दिवसांच्या मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये डान्स, संगीत, कला, खेळ, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते; मात्र यंदा या उन्हाळी शिबिराला कोरोनाचा फटका बसला आहे.
------------------------
कोरोनाचा प्रादुर्भाव; नागरिकांची पाठ
बार्शी टाकळी : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना केली जात असतानाही नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांच्या दुर्लक्षतेमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-------------------------------------------
देगाव-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था
वाडेगाव: देगाव-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
----------------------------------------
पिकांना बसतोय उन्हाचा फटका!
पातूर : एप्रिल महिना सुरू होताच उन्हाचा पारा वाढला आहे. यामुळे बागायती पिकांना फटका बसत आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा, भुईमूग पिकाची उशिरा पेरणी केली. पिकांना तापमानाचा फटका बसत असून, शेतकरी चिंतेत सापडले आहेत.