राहित उपकेंद्रांतर्गत २१९ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:21 AM2021-08-23T04:21:51+5:302021-08-23T04:21:51+5:30
राहित येथील उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या राहित, साहित, निंबी बुद्रुक, निंबी खुर्द, टाकळी, खांबोरा आणि पार्डी मोझर बु. आदी गावांत ...
राहित येथील उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या राहित, साहित, निंबी बुद्रुक, निंबी खुर्द, टाकळी, खांबोरा आणि पार्डी मोझर बु. आदी गावांत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लसीकरणाच्या यशस्वितेसाठी गावात सरपंचांनी दवंडी देऊन जनजागृती केली. त्यामुळे या शिबिरांना प्रतिसाद मिळाला असून, एकाच दिवसात २१९ जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डॉ. आगलावे यांच्या मार्गदर्शनात लसीकरण शिबिर यशस्वी झाले. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी भूषण राठोड, एम. पी. सोळंके, आरोग्य सेविका संगीता जाधव, राहित आशा वर्कर कोकिळा ताई, साहित आशा वर्कर रेखा चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते. तसेच सरपंच अलका शिवाजी देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अतुल देशमुख, ग्रामपंचायत सदस्या राणी कटाळे, दीपक देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
------------------------
शिबिरापूर्वी गावांमध्ये दिली दवंडी
राहित उपकेंद्राअंतर्गत येत असलेली आठ गावे राहित, साहेित, पार्डी, मोजर बुद्रुक, निंबी खुर्द, निंबी बुद्रुक, टाकळी, खांबोरा येथील सरपंचांनी सहकार्य केले. सरपंचांनी शिबिराच्या पूर्वी गावात दवंडी देऊन जनजागृती केली. परिणामी नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.