शिंगोली येथे ८० नागरिकांचे लसीकरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:17 AM2021-05-01T04:17:16+5:302021-05-01T04:17:16+5:30

हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ गावांत आरोग्य सेवा पुरवली जाते. सध्या कोविड-१९ चा कहर सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

Vaccination of 80 citizens in Shingoli! | शिंगोली येथे ८० नागरिकांचे लसीकरण !

शिंगोली येथे ८० नागरिकांचे लसीकरण !

Next

हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ गावांत आरोग्य सेवा पुरवली जाते. सध्या कोविड-१९ चा कहर सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोग्य केंद्रांतर्गत गावागावांत जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. कोविड-१९ वर मात करणारी लस सुरक्षित असून जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण केंद्रात येऊन लस घेण्याचे आवाहन डॉ. गजानन भुस्कुटे यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यात मृत्यूचे प्रमाणही वाढताना दिसून येत आहे. शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन आणि सर्वांचे लसीकरण झाले पाहिजे यासाठी लसीकरणाची गती वाढवण्याची मागणी शिंगोली सरपंच महेश बोर्डे यांनी केली. यावेळी हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भुस्कुटे, शिंगोली सरपंच महेश पाटील बोर्डे, पोलीस पाटील संतोष बोर्डे, मुख्याध्यापिका रुजिता जस्ताब, ग्रामसेवक प्रमोद उगले, शिक्षक संतोष ताले, हातरुण ग्रामसेवक किशोर वाकोडे, आरोग्य सेविका गावंडे, आरोग्यसेविका इंगळे, आरोग्यसेवक डाबेराव, आरोग्यसेवक दांदळे, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचयात कर्मचारी नितीन इंगळे आदी उपस्थित होते. (फोटो)

----------------------------

कोरोनाचा कहर सुरू असून, लसीकरण अतिशय संथ गतीने सुरू आहे. लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्याची नितांत गरज आहे. जिल्हा परिषद सर्कलनिहाय कोविड सेंटर सुरू केल्यास रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकतात.

- राम गव्हाणकर, माजी सदस्य, जिल्हा परिषद, अकोला.

Web Title: Vaccination of 80 citizens in Shingoli!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.