दिव्यांगांसाठी लसीकरण सुरु करावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:18 AM2021-05-23T04:18:25+5:302021-05-23T04:18:25+5:30
‘दहावीच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा !’ अकाेला: दहावीच्या परिक्षांबाबत निर्णय घेताना अन्य बोर्डांंचा विचार करुन एसएससी बोर्डाच्या मुलांवर अन्याय होणार ...
‘दहावीच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा !’
अकाेला: दहावीच्या परिक्षांबाबत निर्णय घेताना अन्य बोर्डांंचा विचार करुन एसएससी बोर्डाच्या मुलांवर अन्याय होणार नाही. सर्वांना समान न्याय द्यावा, अशी भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी घेतली आहे़ गतवर्षी अंतिम वर्षाला परीक्षा नको, अशी मागणी युवा सेनेने केली हाेती. त्यावर उच्च. शिक्षण मत्र्यांनी कुलपती, कुलगुरू, विद्यापीठ, सीनेट, तज्ञ यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेतला होता.
भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांंनी सांगितले की, न्यायालयाच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. किंबहुना परिक्षा घेण्यात विद्यार्थ्यांचे हितच आहे, अशी भूमिका गतवर्षी अंतिम वर्षे परिक्षांबाबत भाजपाने मांडली होती. आजही तीच भूमिका आहे.
शासकीय वैद्यकीय यंत्रणेवर ताण
अकाेला: जिल्ह्यासह शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचा फैलाव झाला असून काेराेना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ नागरिकांनी नियमांचे पालन न केल्याचे परिणाम समाेर आले आहेत़ दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये व्हेंटीलेटरची कमतरता निर्माण झाली असून वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण आल्याचे चित्र आहे़ रुग्ण संख्या वाढल्याने यंत्रणा सैरभैर झाली आहे़
ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी धावपळ
अकाेला: शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय असाे वा खासगी रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातूनच नव्हे तर नागपूर, नांदेड, हिंगाेली, वाशिम, बुलडाणा, अमरावती तसेच मध्य प्रदेशातूनही काही रुग्ण दाखल हाेत आहेत़ यामुळे वैद्यकीय यंत्रणांवरील ताण वाढला असून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे़ ऑक्सिजनसाठी रुग्णालयांची धावपळ हाेत आहे़
भर उन्हात पाेलिसांकडून तपासणी
अकाेला: जीवघेण्या काेराेना विषाणूचा संसर्ग राेखण्यासाठी नागरिक पुढाकार घेत नसल्याचे पाहून राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास मुभा असून त्यानंतर घराबाहेर निघण्यास सक्त मनाइ करण्यात आली आहे़ अशावेळी पाेलिसांकडून भर उन्हात घराबाहेर निघणाऱ्या नागरिकांची चाैकशी व वाहनांची तपासणी केली जात आहे़
लसीकरणासाठी पुढाकार घ्या !
अकाेला: शहरातील ४५ वर्ष वयोगटातील व त्यापेक्षा जास्त असलेल्या नागरिकांनी काेराेना लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टसींगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून व चेह-यावर मास्क आणि हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायजरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने केल्या जात आहे.
बाजारात नियम पायदळी
अकाेला: शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असताना देखील बाजारात साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मनपाच्या सूचनांकडे अकाेलेकर कानाडाेळा करीत असल्यामुळे शहरात काेराेनाचा प्रसार वाढला आहे.