माणसांचे लसीकरण लांबले अन् जनावरांचे लटकले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:17 AM2021-05-17T04:17:07+5:302021-05-17T04:17:07+5:30

--बाॅक्स-- जिल्ह्यातील जनावरांची एकूण आकडेवारी शेळ्या १५१०७६ मेंढ्या ९५८१ गायी-बैल २३३२७१ म्हशी ४९७९७ --बॉक्स-- कोणकोणत्या दिल्या जातात लस? गायी-म्हशींनी ...

Vaccination of human beings is long and animals are hanging ...! | माणसांचे लसीकरण लांबले अन् जनावरांचे लटकले...!

माणसांचे लसीकरण लांबले अन् जनावरांचे लटकले...!

Next

--बाॅक्स--

जिल्ह्यातील जनावरांची एकूण आकडेवारी

शेळ्या १५१०७६

मेंढ्या ९५८१

गायी-बैल २३३२७१

म्हशी ४९७९७

--बॉक्स--

कोणकोणत्या दिल्या जातात लस?

गायी-म्हशींनी मे महिन्यात घटसर्प, फऱ्या, लाळ्या व खुरकत ही लस देण्यात येते.

मे महिन्यात वर्षातून एकवेळेस रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या भागात फाशी ही लस देण्यात येते.

शेळ्या-मेंढ्यांना घटसर्प, लाळ्या, खुरकत, फऱ्या व काळपुळी ही लस देण्यात येते.

आंत्रविषार ही लस वर्षातून एकदा एप्रिलमध्ये देतात. या लसी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने द्याव्या.

--बॉक्स--

नोव्हेंबर हुकला, आता काय होणार?

कोरोनाचा सर्वच योजनांवर परिणाम झाला असून, जनावरांच्या लसीकरणावरही ही स्थिती दिसून येते. जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण नोव्हेंबर व मे महिन्यांत करण्यात येते. नोव्हेंबरमध्येही लसीकरण उशिरा झाले होते. आता मे महिन्यात अद्यापही लसीकरण बाकी आहे.

--कोट--

कोरोनाचा लसीकरणावर परिणाम

कोरोनामुळे मे महिन्याच्या लसीकरणावर परिणाम झाला आहे. अद्याप लसीचा पुरवठा होऊ शकला नाही. लसीचा पुरवठा झाल्यावर तत्काळ लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल.

- डॉ. तुषार बावणे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन

--कोट--

पशुपालक चिंतेत...

दरवर्षी मे महिन्यात होणारे जनावरांचे लसीकरण अजून झाले नाही. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जनावरांमध्ये रोगराई पसरण्याची शक्यता अधिक आहे.

- राजू गावंडे, पशूपालक, सीसा

--कोट--

यावर्षी अद्याप पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतलेली नाही. यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. लसीकरण मोहीम लवकरात लवकर हाती घ्यावी.

- राहुल देवर, पशूपालक, नेमतापूर

Web Title: Vaccination of human beings is long and animals are hanging ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.