गर्भवतींच्या लसीकरणास लवकरच सुरुवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:14 AM2021-07-11T04:14:33+5:302021-07-11T04:14:33+5:30
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी गरोदर महिलांच्या लसीकरणाविषयी अनेकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर ...
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी
गरोदर महिलांच्या लसीकरणाविषयी अनेकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर महिलांसाठी कोविडची लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. गरोदरांनी लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, सर्वसामान्यांनी लस घेण्यापूर्वी जी काळजी घ्यावी, तीच काळजी गर्भवतींनीही घेणे गरजेचे आहे. तसेच लस घेतल्यानंतर ताप आल्यास पॅरासिटामोल घेण्याचाही सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, कुठलेही औषध घेण्यापूर्वी गर्भवतींनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, असे आवाहन देखील डॉक्टरांनी केले आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयातून मोहीम सुरू होण्याची शक्यता
वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, गर्भवतींच्या लसीकरण मोहिमेस जिल्हा स्त्री रुग्णालयातून सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी गर्भवती नियमित तपासण्यांसाठी येत असतात. त्यामुळे येथेच गर्भवतींसह स्तनदा मातांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.