ज्येष्ठांना लसीकरण; आरोग्य विभागाकडे यादीच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:24 AM2021-02-27T04:24:50+5:302021-02-27T04:24:50+5:30
झोन किंवा वॉर्डनिहाय होऊ शकते लसीकरण वैद्यकीय सूत्रांच्या मते, जिल्ह्यातील ज्येष्ठांची संख्या पाहता त्यांची माहिती संकलित करणे आणि कोविन ...
झोन किंवा वॉर्डनिहाय होऊ शकते लसीकरण
वैद्यकीय सूत्रांच्या मते, जिल्ह्यातील ज्येष्ठांची संख्या पाहता त्यांची माहिती संकलित करणे आणि कोविन ॲपमध्ये समाविष्ट करण्यात मोठा वेळ खर्ची होऊ शकतो. त्यामुळे ही मोहीम पोलिओच्या धर्तीवर वॉर्डनिहाय किंवा झोननिहाय राबविण्यात येऊ शकते. लसीकरणासंदर्भात हा अंदाज वर्तविण्यात येत असला, तरी आरोग्य विभाग शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या प्रतीक्षेत आहे.
कोविनॲप दोन दिवस राहणार बंद
कोविड लसीकरण मोहिमेत कोविनॲपची महत्त्वाची भूमिका आहे. या ॲपमध्ये गरजेनुसार अद्यावतीकरण करण्यात येणार आहे. त्याआनुषंगाने कोविनॲप २७ आणि २८ फेब्रुवारी, असे दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाबाबत वरिष्ठ स्तरावरून अजून तरी मार्गदर्शक सूचना मिळाल्या नाहीत. शिवाय, दोन दिवसांच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करणे शक्य नाही. त्यामुळे मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच पुढील रूपरेषा ठरणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला