लस माेफत; निर्णयाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:22 AM2021-04-30T04:22:47+5:302021-04-30T04:22:47+5:30
मनपाच्या काेराेना याेद्धांचा सत्कार अकाेला : ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण असाे वा चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांचे नमुने जमा करणाऱ्या महापालिकेच्या काेराेना ...
मनपाच्या काेराेना याेद्धांचा सत्कार
अकाेला : ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण असाे वा चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांचे नमुने जमा करणाऱ्या महापालिकेच्या काेराेना याेद्धांचा बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला़ हरिहरपेठमधील मनपाच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक १९ मध्ये लसीकरण करणाऱ्या महिला व पुरुष याेद्धांचा आ़ गाेवर्धन शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
भाजपकडून स्ट्रेचर, व्हीलचेअर भेट
अकाेला : काेराेनाच्या संकटकाळात केंद्रीय राज्यमंत्री ना़ संजय धाेत्रे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक आराेग्य केंद्राला स्ट्रेचर व व्हीलचेअर उपलब्ध करून दिले. बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच स्त्रियांच्या जिल्हा रुग्णालयास प्रत्येकी ३५ स्ट्रेचर, व्हीलचेअर भाजप जिल्हाध्यक्ष आ़ रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. यावेळी आ़ गाेवर्धन शर्मा, महापाैर अर्चना मसने, विजय अग्रवाल, अनुप धाेत्रे उपस्थित हाेते़
बाजारात उसळली गर्दी !
अकाेला : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने सकाळी ७ ते ११ वाजतापर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी व विक्री करण्याची परवानगी दिली आहे़ सकाळी शहरात प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला किरकाेळ साहित्य विक्रीची दुकाने थाटली जातात़ याठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येते़ यामुळे काेराेनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे़
उन्हाचा पारा वाढला!
अकाेला : शहरात पुन्हा एकदा वाढत्या उन्हामुळे अकाेलेकरांच्या जीवाची लाहीलाही हाेत आहे़ मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढला असून भटक्या जनावरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़ काेराेनामुळे कडक निर्बंध लागू झाल्याने नागरिकांची वर्दळ कमी झाली असली, तरी उन्हामुळे आराेग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत़
‘न्यू तापडियानगरात पाेलीस चाैकी उभारा!’
अकाेला : प्रभाग क्रमांक ३ मधील न्यू तापडियानगर, खरप, पंचशीलनगर व दुबे वाडी या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत़ त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्याची मागणी आधार फाउंडेशनच्या वतीने बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.