वकिलास मारहाण; न्यायालयाचे कामकाज बंद
By admin | Published: August 9, 2016 02:30 AM2016-08-09T02:30:57+5:302016-08-09T02:30:57+5:30
दारव्हा येथील घटनेचा निषेध; अकोला बार असोसिएशनचे आंदोलन.
अकोला: यवतमाळ जिल्हय़ातील दारव्हा न्यायालय परिसरातील वाहनतळावर दुचाकी लावण्याच्या कारणावरून पोलीस शिपायाने वकिलास बेदम मारहाण केली. अँड. रूपचंद लक्ष्मणराव कठाणे यांना दुचाकी लावण्याच्या कारणावरून पोलिसाने मारहाण केली होती. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी अकोला बार असोसिएशनद्वारे अकोला जिल्हा व सत्र न्यायालयासह दिवाणी न्यायालयाचे महत्त्वाचे कामकाज वगळता इतर सर्व कामे बंद ठेवण्यात आली होती. या प्रकाराने संतप्त वकील मंडळींनी तत्काळ वकील संघाची बैठक घेऊन पोलीस ठाणे गाठले. संबंधित शिपायावर कारवाईची मागणी केली; मात्र शनिवारी उपस्थित अधिकार्यांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला. त्यामुळे अकोला न्यायालयातील कामकाज बंद ठेवताच सदर पोलीस कर्मचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.