६७ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 01:30 PM2020-03-14T13:30:00+5:302020-03-14T13:30:15+5:30
६७ हजार ६५९ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.
अकोला : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी शुक्रवार, १३ मार्चपर्यंत जिल्ह्यात ६७ हजार ६५९ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या १ लाख ११ हजार ७९ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २९ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध करण्यात याद्यानुसार शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू आहे. त्यामध्ये १३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ६७ हजार ६५९ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रक्कम इत्यादींचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.
१८ हजार कर्जखात्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित!
जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यापैकी १३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ६७ हजार ६५९ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले असून, उर्वरित १८ हजार ९५७ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे.
२४ हजार शेतकºयांच्या कर्जखात्यात १८८ कोटी!
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत १३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील २४ हजार ९२८ शेतकºयांच्या कर्जखात्यात १८८ कोटी १३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली.