५५ नंबरची किंमत १ लाख ५0 हजार रुपये!

By Admin | Published: May 19, 2014 10:04 PM2014-05-19T22:04:57+5:302014-05-19T23:23:57+5:30

वाहनावरील विशेष नंबरसाठी शुल्काचा पर्याय; उपप्रादेशिक परिवहन विभागाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त.

The value of 55 numbers is Rs. 1 lakh 50 thousand! | ५५ नंबरची किंमत १ लाख ५0 हजार रुपये!

५५ नंबरची किंमत १ लाख ५0 हजार रुपये!

googlenewsNext

अकोला: दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी दिवसागणिक वाढत आहेत. सोबतच वाहनांवरील विशेष नंबरचीसुद्धा क्रेझ प्रचंड वाढली आहे. विशेष नंबरसाठी युवा वर्ग खास आग्रही आहे. वाहनावरील विशेष नंबर प्राप्त करण्यासाठी लाखो रुपयांचे शुल्क भरायला तयार होतात. नंबरप्रती नागरिकांची असलेली मागणी पाहता, उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष नंबरसाठी शुल्काचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून आरटीओलासुद्धा लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होत आहे. वाहनांसाठी विशेष नंबर प्राप्त करण्यासाठी काही महिन्यांपासून स्पर्धा सुरू झाली आहे. २0१३-१४ या वर्षामध्ये अकोला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एका चारचाकी वाहनासाठी एमएच ३0 एएल ५५ हा विशेष क्रमांक तब्बल १ लाख ५0 हजार रुपयांमध्ये विकला गेला. गत वर्षाच्या तुलनेत विकल्या गेलेला हा विशेष क्रमांक सर्वात महाग ठरला. यापूर्वीही नागरिकांनी २५ हजार, ५0 हजार, ७५ हजार रुपये देऊन वाहनांसाठी विशेष क्रमांक आरटीओ कार्यालयाकडून प्राप्त केले होते. ५५ हा विशेष क्रमांक दुचाकीसाठी देण्यात आला होता; परंतु वाहनचालक हा दुचाकीचा क्रमांक चारचाकी वाहनावर लावण्यासाठी आग्रही होते. दुचाकीच्या ५५ या नंबरसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने ५0 हजार रुपये शुल्क निश्चित केले होते; परंतु चारचाकी वाहनचालक ५५ नंबर प्राप्त करण्यासाठी वा˜ेल ती किंमत मोजायला तयार असल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने नियम शिथिल करून हा नंबर दीड लाख रुपयांमध्ये चारचाकी वाहनाला देऊन टाकला. हा नंबर या वर्षातील सर्वात महाग ठरला आहे.

Web Title: The value of 55 numbers is Rs. 1 lakh 50 thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.