Akola ZP Election Results: अकोल्यात वंचित बहुजनची 'आघाडी'; भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पडले मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 12:28 PM2021-10-06T12:28:14+5:302021-10-06T12:43:17+5:30
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद तसंच त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुक झाली आहे.
अकोला: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचानिकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लागलं आहे. याचदरम्यान अकोलाजिल्हा परिषदेचा 14 जागांचा निकाल लागला आहे.
अकोला जिल्हा परिषद 14 पैकी सहा जागांवर वंचित बहुजन आघाडीने विजय प्राप्त केला आहे. तर अपक्ष गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन जागांवर विजय झाला आहे. तसेच शिवसेनेसह भाजपा आणि काँग्रेसला १ जागेवर समाधान मानावे लागले आहे.
अकोला जिल्हा परिषद : (विजयी/आघाडी)
निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना
2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित
3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष
4) अंदूरा : मीना बावणे : वंचित
5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी
6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष
7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित
8) बपोरी : माया कावरे : भाजप
9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित
10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित
11) दानापुर: गजानन काकड: काँग्रेस
12) तळेगाव: संगीता आढाऊ: वंचित
13) कानशिवनी: किरण अवताडे; राष्ट्रवादी
14) कुटासा: स्फुर्ती निखिल गावंडे: प्रहार
एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14
वंचित : 06
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस: 01
प्रहार: 01
दरम्यान, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद तसंच त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुक झाली आहे.