वंचित बहुजन आघाडीचे १६ प्रवक्ते घोषित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:13 PM2019-02-24T13:13:57+5:302019-02-24T13:14:03+5:30
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राज्यात १६ प्रवक्ते शनिवारी घोषित करण्यात आले.
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राज्यात १६ प्रवक्ते शनिवारी घोषित करण्यात आले. भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांची नियुक्ती केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते म्हणून १६ जणांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी घोषित केले. त्यानुसार प्रा. विजय चव्हाण, लक्ष्मण माने, अमोल पांढरे, दिशा शेख, सिद्धार्थ मोकळे, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, अमील भुईगळ, राजेंद्र पातोडे, सुभाष भिंगे, हमराज उईके, रेखा ठाकूर, धम्मसंगिनी, संतोष संखद, सचिन माळी, मिलिंद पखाले व गोविंद दळवी यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते म्हणून घोषित करण्यात आले आहे.