मोबाइलमध्ये फोटो काढण्याच्या कारणावरून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:43 AM2017-10-17T01:43:05+5:302017-10-17T01:43:24+5:30
मोबाइलमध्ये फोटो काढण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत तिघे जखमी झाल्याची घटना शिर्ला येथे १६ ऑक्टोबरच्या सकाळी ९:३0 वाजता घडली. या प्रकरणात दाखल फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : मोबाइलमध्ये फोटो काढण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत तिघे जखमी झाल्याची घटना शिर्ला येथे १६ ऑक्टोबरच्या सकाळी ९:३0 वाजता घडली. या प्रकरणात दाखल फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पातूर पोलिसात नीलेश गजानन बोचरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ढाब्यावर जाऊन मोबाइलमध्ये फोटो का काढले, यावरून आपल्याबरोबर सागर निलखन, शिवा निलखन, डिंगाबर निलखन, अनिल गिर्हे यांनी वाद घातला. वाद वाढत जाऊन दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये दीपक बोचरे हे गंभीर, तर नीलेश गजानन बोचरे, गजानन सिदाजी बोचरे जखमी झाले. या प्रकरणात चौघांविरुद्ध कलम ३२४, ५0४, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्या गटाचे दत्तात्रय निलखन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डिझेलसाठी ३00 रुपये बोचरेकडून उधार घेतले. ते ३00 रुपये परत केले.तरीही लाथा-बुक्कयांनी मारहाण केली. त्यावरून पातूर पोलिसांनी रात्री उशिरा निलेश बोचरे, गजानन बोचरे,दिपक बोचरे, गणेश बोचरे, या चौघांविरुद्ध भादंविच्या ३३0,५0४,५0६ कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.