राष्ट्रवादीच्या उमेदवारीत मोठी उलथापालथ!
By admin | Published: February 4, 2017 02:31 AM2017-02-04T02:31:11+5:302017-02-04T02:31:11+5:30
काँग्रेस, भाजप, सेनेच्या विद्यमान नगरसेवकांसह पदाधिकारी राष्ट्रवादीच्या तिकिटावर
अकोला, दि. 0४- राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच काँग्रेसचे सहा आणि इतर पक्षांचे चार नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये आणून निवडणुकीची मोर्चेबांधणी केली. आतासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांच्या नावांच्या यादीत फेरबदल करीत मोठी उलथापालथ घडवून आणत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका उषा विरक, भाजपच्या नगरसेविका कल्पना गावंडे, शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू गाढे, भाजपचे मनोज साहू यांना उमेदवारी देत धक्कातंत्राचा वापर केला.
गुरुवारी रात्री उशिरापर्यंंत राष्ट्रवादीची बैठक सुरू होती. बैठकीमध्ये माजी मंत्री गुलाबराव गावंडे, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, शहराध्यक्ष अजय तापडिया, समन्वयक मनोहर दांदळे, संग्राम गावंडे, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष सचिन वाकोडे पाटील यांनी विचारमंथन केल्यानंतर ८0 उमेदवारांच्या नावांची यादी तयार केली. या यादीमध्ये भाजप, काँग्रेस, सेनेच्या नाराज आजी-माजी नगरसेवकांसोबतच नाराज पदाधिकार्यांनासुद्धा उमेदवारी बहाल केली. इतर राजकीय पक्षांमधील पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांंच्या नाराजीचा पुरेपूर फायदा घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केला. राष्ट्रवादीने प्रभाग १ (नायगाव) ह्यअह्ण मधून अ. रहीम अ. कादिर, ह्यबह्ण शरीफाबी युनुस खान, ह्यकह्ण हाजराबी अ. रशिद, ह्यडह्ण मधून आसिफ खान नवाज खान, प्रभाग क्रमांक २ मधून रवी विष्णुपंत मेश्राम, आतियाबानो राजीक खान, नजमाबी ज.मो. हुसैन, अ. साजिद अ. सईद, प्रभाग ६ मधून रेवती रमेश तायडे, देवानंद टाले, सरिता मयूर विखे, पवन महल्ले, प्रभाग ३ ह्यकह्ण मधून जया राजेश शुक्ला, प्रभाग ५ मधुन शैलेश बोदडे, अमित ठाकरे, प्रभाग १३ मधून प्रफुल्ल सा. भारसाकळे, करुण सा. भारसाकळे, प्रभाग ९ मधून शीतल अजय रामटेके, अफसर अहेमद, शीतल मनोज गायकवाड, मो. फजलू, प्रभाग १0 मधून नितीन झापर्डे, वर्षा विजय दुतोंडे, प्रभाग १७ मधून शीतल संतोष डाबेराव, रिजवाना परवीन शे. अजीज, प्रभाग ११ मधून नकीर खान, प्रभाग १२ मधून मनोज साहू, उषा विरक, जगजितसिंग विरक, प्रभाक १६ मधून मो. रफिक सिद्दिकी, प्रभाग १८ राजू लक्ष्मण गाढे, दिलीप देशमुख, प्रभाग १५ मधून कल्पना अजय गावंडे, भाग्यश्री चंद्रकांत झटाले, अनुज अजय तापडिया, निशिकांत बडगे, प्रभाग १९ मधून अजय इंगोले, अर्चना अनिल माहोरे, पंकज पंजाबराव गावंडे, पुष्पा भाऊराव पावसाळे, प्रभाग २0 मधून योगीता शेळके, किरण शिवराज मोहोड आदींना उमेदवारी दिली.