‘वॅपकॉस’, कन्टेनरच्या विषयाला कार्योत्तर मंजुरी देण्याचा घाट!

By admin | Published: August 19, 2015 01:55 AM2015-08-19T01:55:54+5:302015-08-19T01:55:54+5:30

महापालिकेत भाजपचा शिवसेनेला पुन्हा शह.

'Vapcos', the fate of the container sanctioning farewell! | ‘वॅपकॉस’, कन्टेनरच्या विषयाला कार्योत्तर मंजुरी देण्याचा घाट!

‘वॅपकॉस’, कन्टेनरच्या विषयाला कार्योत्तर मंजुरी देण्याचा घाट!

Next

अकोला: 'वॅपकॉस', कन्टेनरच्या खरेदी प्रकियेला कार्योत्तर मंजुरी देण्याचा घाट महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी रचल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी नागपूरच्या ह्यलाखाणीह्ण नामक इसमाकडून आर्थिक सोपस्कार पार पडले असून, या प्रक्रियेत पुन्हा एकदा मित्र पक्ष शिवसेनेला अलगद बाजूला सारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनपात १४ ऑगस्ट रोजी आयोजित सर्वसाधारण सभा स्थगित झाली. महान ते अकोला तसेच संपूर्ण शहरातील जलवाहिनी बदलण्यासाठी ह्यडीपीआरह्ण(प्रकल्प अहवाल) तयार करण्याच्या अनुषंगाने ह्यवॅपकॉसह्ण नामक एजन्सीची नियुक्ती करण्याचा आग्रह सत्ताधारी भाजपमधील एका गटाने लावून धरला आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तब्बल १0 ते ११ कोटींचा खर्च येणार असल्याचे एजन्सीने नमूद केले असून, इतर सेवा शुल्क व विविध रकमा वाढत जाऊन हा खर्च १४ कोटींच्या आसपास पोहोचणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जलवाहिन्यांचा सर्वे केल्यास केवळ तीन ते साडेतीन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अर्थातच, ह्यवॅपकॉसह्णसोबत हातमिळवणी करून कोट्यवधी रुपयांवर ताव मारण्याचा भाजपमधील काही जणांचा प्रयत्न आहे. या प्रकाराला मित्र पक्ष शिवसेनेने विरोध दर्शविला असला तरी भाजपने उपमहापौर विनोद मापारी यांना मात्र पूर्णपणे विश्‍वासात घेतल्याची माहिती आहे. यासोबतच २ कोटी रुपयांतून कचरा साठवणुकीसाठी ५00 कंटेनर (कचरा पेटी) खरेदी केल्या जाणार आहेत. ३00 कंटेनर मोठे तर २00 लहान आहेत. याकरिता साई फायबर नामक एजन्सीची निवड करण्यात आली. नागरिकांच्या घरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी २२ लाख रुपये किमतीतून ४00 घंटागाड्या खरेदी केल्या जातील. मूर्तिजापूर येथील गायत्री महिला उद्योग संस्थेची ई-निविदा मंजूर झाल्याची माहिती आहे. या दोन्ही निविदेसह तेराव्या वित्त आयोगातील प्राप्त निधीलादेखील कार्योत्तर मंजुरी देण्याची पूर्ण तयारी भाजपच्या समन्वय समितीने केल्याची माहिती आहे. मनपात काँग्रेसला बसणार मोठा धक्का! एक गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात अकोला : महानगरपालिकेच्या राजकीय क्षेत्रात लवकरच मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेसला येत्या काही आठवड्यांमध्ये मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून, त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त शोधल्या जात आहे. गत काही वर्षांत अकोला जिल्हय़ात राष्ट्रवादी काँग्रेस केवळ नावाला शिल्लक राहिली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अपवादात्मक यश वगळता राष्ट्रवादीच्या खात्यावर ठोस काहीही नोंदविल्या गेले नाही. त्यामुळे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जिल्ह्यात मोठे बदल घडवून आणण्याचे संकेत दिले होते. त्याची सुरुवात अनपेक्षिपणे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदावर विजय देशमुख यांच्या नियुक्तीने केली आहे. आता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी इतर पक्षातील प्रभावशाली आणि जिल्हाध्यक्षांचे निकटवर्तीय समजल्या जाणार्‍या नगरसेवकांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रयत्नांचा सर्वात मोठा फटका महानगरपालिकेत काँग्रेसलाच बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ६ पेक्षा अधिक नगरसेवक आणि महानगर कार्यकारिणीतील काही ज्येष्ठ पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. येत्या काही आठवड्यातच त्यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे सध्या महानगरपालिकेत काँग्रेस 'बॅकफूट'वर आल्याचे दिसून येत आहे.

Web Title: 'Vapcos', the fate of the container sanctioning farewell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.