वर्हाडातील पांढरं सोनं भिजलं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 01:41 AM2017-10-10T01:41:08+5:302017-10-10T01:41:13+5:30
अकोला : विदर्भात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने हाती आलेलं पांढर (कापूस) सोनं भिजलं असून यामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे सर्वाधिक नुकसान पश्चिम वर्हाडात झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने हाती आलेलं पांढर (कापूस) सोनं भिजलं असून यामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे सर्वाधिक नुकसान पश्चिम वर्हाडात झाले.
पश्चिम विदर्भात गतवर्षीच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र यावर्षी वाढले असून, ९२ टक्के क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. गतवर्षी ८ लाख ६१ हजार ३00 हेक्टर म्हणजे ७९ टक्केच पेरणी झाली होती. यावर्षी ९ लाख ९६ हजार १७ हेक्टर म्हणजेच ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्हय़ात ४ लाख ७0 हजार ३१५ हेक्टरवर म्हणजेच १0४ टक्के , अमरावती जिल्हय़ात २ लाख ७ हजार ४५७ हेक्टर, बुलडाणा १ लाख ७५ हजार 0५ हेक्टर, अकोला १ लाख १२ हजार ३१९ हेक्टर, तर वाशिम जिल्हय़ात ३0 हजार ९२१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा आल्याने पेरण्या उशिरा झाल्या आहेत. त्यानंतर पावसाचा खंड पडला पण, असे असतानाही कपाशीचे पीक जोरदार आले आहे. दसर्याला विदर्भात ‘सीतादही’ म्हणजेच कापसाच्या शेतात पूजा करू न वेचणी केली जाते.
यावर्षी मान्सूनपूर्व कापूस वेचणीला आला आहे. खरीप हंगामातील ज्या शेतकर्यांनी जूनमध्ये पेरणी केली, तेथेही कापूस वेचणीला आला आहे. पण गत दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने हाती आलेल्या या पांढर्या सोन्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. मूग, उडीद, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासर्व पिकांची कसर कापूस पीक भरू न काढेल, अशी अपेक्षा होती; पण आज आलेला पाऊस तोंडचा घास हिरावून घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकर्यांनी कापूस वेचून घ्यावा, ओट्यावर टाकून ताडपत्रीने झाकून घ्यावे, झाडं मोठी असतील तसेच पर्हाटीच्या फांद्या जमिनीवर लोळत असतील, तर त्यासाठीची उपाययोजना करू न झाडांना उंच बांधण्याची सोय करावी, शेतात पाणी साचले असल्यास चर काढून पाणी बाहेर काढावे.
- डॉ. व्ही.एम.भाले,कूलगुरू,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.