वऱ्हाडची ‘कांदा बियाणे हब’कडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:24 PM2020-01-24T18:24:19+5:302020-01-24T18:24:25+5:30

बीजोत्पादनातून उत्पादन व उत्पन्न चांगले मिळत असल्याने वºहाडातील पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासह कांदा बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे.

Varhada become Onion Seed Hub | वऱ्हाडची ‘कांदा बियाणे हब’कडे वाटचाल!

वऱ्हाडची ‘कांदा बियाणे हब’कडे वाटचाल!

Next

- राजरत्न सिरसाट
अकोला: कांदा बीजोत्पादनासाठी पश्चिम (वºहाड) विदर्भातील शेती, माती व हवामान अनुकूल असून, कांदा उत्पादनासह बीजोत्पादनातून उत्पादन व उत्पन्न चांगले मिळत असल्याने वºहाडातील पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासह कांदा बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये अकोला जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. पोषक हवामानामुळे हा भाग ‘कांदा बियाणे हब’कडे वाटचाल करीत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पश्चिम विदर्भातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत शेतात विविध प्रयोग करीत असून, विविध पिकेही घेत आहेत. कांदा हे पीक नाशिक, पश्चिम महाराष्टÑातील मानले जाते. आता वºहाडातील शेतकऱ्यांनी कांदा पिकासह बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकरी बीजोत्पादनावर भर देत आहेत. कांदा बीजोत्पादनाला प्रति क्ंिवटल ३५ ते ५० हजार रुपये दर आहेत. त्यामुळे कांदा उत्पादनापेक्षा बीजोत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल आहे. अकोला जिल्ह्यात जवळपास एक हजार हेक्टरवर शेतकरी बियाणे उत्पादन घेत आहेत.
कांदा बीजोत्पादनाकडे शेतकºयांचा वाढता कल बघता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बियाणे लागवड तंत्रज्ञान विकसित केले असून, तंत्रज्ञानानुसार शेतकºयांना कांद्याचे निरोगी बियाणे व लागवड पद्धत, एकरी बियाणे किती लागते, कांद्याची एकच जात पेरणी करणे अत्यावश्यक आहे. परागीकरण महत्त्वाचे आहे. म्हणूनच एका जातीपासून दुसरी कांद्याची जात एक किलोमीटर दूर पेरलेली असावी, आदींबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विभाग कांदा लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देत असून, कांदा साठवणुकीसाठी चाळी तयार करण्यावर भर देत आहे.


उत्पन्नाची हमी; कंपन्यांसोबत करार!
कांदा बीजोत्पादनातून एकरी चार ते पाच क्ंिवटल उत्पादन होत असून, बियाण्याला प्रति क्ंिवटल ३५ ते ५० हजार रुपये क्ंिवटल दर आहेत. विशेष म्हणजे, वºहाडातील शेतकºयांनी थेट कंपन्यांसोबत करार केला आहे. त्यामुळेच शेतकºयांना विक्रीची अडचण येत नाही.

यावर्षी पेरणी घटली!
यावर्षी कांद्याचे दर गगनाला भिडल्याने कांदा पेरणीवर परिणाम झाला आहे. बीजोत्पादनावरही अल्प परिणाम झाला आहे.
 

पश्चिम विदर्भातील जमीन व हवामान कांदा बीजोत्पादनासाठी प्रचंड अनुकूल असून, हा भाग ‘कांदा बियाणे हब’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. शेतकºयांना त्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- डॉ. एस. एम. घावडे, विभाग प्रमुख, भाजीपाला,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

Web Title: Varhada become Onion Seed Hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.