६ आॅक्टोबरला अकोल्यात वऱ्हाडी साहित्य महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 04:18 PM2019-09-25T16:18:33+5:302019-09-25T16:18:40+5:30
थमच अकोल्यात वऱ्हाडी साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला: ‘सृष्टी’ बहूउद्देशीय युवा संस्था व महात्मा गांधी अभ्यास केंद्र श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच अकोल्यात वऱ्हाडी साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ६ आॅक्टोबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता वसंत सभागृह, श्री शिवाजी महाविद्यालय, येथे आयोजित महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी देवकाताई देशमुख (साहित्यिक, सामाजिक कार्यकार्त्या) यांची निवड करण्यात आली असून, उद् घाटक म्हणून महादेवराव भुईभार (कृषी कीर्तनकार) उपस्थित राहणार आहे.
सोबतच महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी प्रा. जे. ए. बांबटकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. रामेश्वर भिसे, अॅड. अनंत खेडकर, डॉ. आनंदा काळे, नरेंद्र लांजेवार, पुष्पराज गावंडे, शीलाताई राजपूत, नीलेश म्हसाये, बाबाराव मुसळे, माणिक शेळके, प्रा. गजानन वाघ, का. रा. चव्हाण, अरविंद भोंडे, श्याम ठक, वनिता गावंडे, कविता राठोड, वा.ह. खंडारे हे उपस्थित राहणार आहे. सदर वºहाडी महोत्सवात ‘शब्दसृष्टी’ दिवाळी अंकाचे प्रकाशन आणि वºहाडी साहित्याची सेवा करणाऱ्या युवा साहित्यिकांचा शब्दसृष्टी वºहाडी युवा साहित्य सन्मान या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येणार आहेत.
कथाकथन सत्राच्या अध्यक्षस्थानी विजय पाटील इंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून गुल्लेरकार नरेंद्र इंगळे यांची उपस्थिती राहील. यात युवा कथाकार अरविंद शिंगाडे तसेच श्रीधर राजणकर यांचे कथाकथन होईल. तिसºया सत्रात कविसंमेलन होणार असून, कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी मीराताई ठाकरे उपस्थित राहणार आहे. कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन अमोल गोंडचवर आणि संदीप देशमुख करणार आहेत. समारोपीय सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा. सदाशिव शेळके, किशोर बळी, देवकाताई देशमुख, सुरेश नागले, रवींद्र जवादे, बापुराव झटाले, शिवलिंग काटेकर, विद्याताई बनाफर, पद्माकर कळसकर, प्रा.डॉ. सुनीता खारोडे, उज्ज्वलाताई कांबळे, प्रा. डॉ. रावसाहेब काळे, प्रतिभा शिरभाते हे उपस्थित राहणार आहेत.