वायगावच्या हळदीने जागतिक बाजारपेठ पिवळी!

By admin | Published: May 18, 2014 12:45 AM2014-05-18T00:45:08+5:302014-05-18T00:50:46+5:30

विदर्भातील वायगावच्या हळदीने जागतिक बाजारपेठेत मजल मारली; लागवडीसाठी अनुदानाचा मार्ग मोकळा

Vayagana haldi global market yellow! | वायगावच्या हळदीने जागतिक बाजारपेठ पिवळी!

वायगावच्या हळदीने जागतिक बाजारपेठ पिवळी!

Next

अकोला : विदर्भातील वायगावच्या हळदीने जागतिक बाजारपेठेत मजल मारली आहे; परंतु कृषी विभागाच्या दप्तरी या हळदीची अधिकृत नोंद नव्हती. या हळदीला अधिकृत मान्यता मिळावी, यासाठी ह्यलोकमतह्णने गत दहा वर्षांपासून पाठपुरावा केल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला या हळदीवर संशोधन सुरू करावे लागले. आता या हळदीला जॉइंट अग्रोस्कोची मान्यता मिळाली असून, या हळदीच्या लागवडीसाठी शेतकर्‍यांना अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील वायगाव या नावाने विदर्भात हळदीची ही जात प्रसिद्ध आहे. सेलम, राजापुरी, कृष्णा, फुले स्वरू पा या हळदीच्या जाती प्रचलित आहेत. वायगावची हळद सात महिन्यात येणारी असून, या हळदीमध्ये कुरकमीन पिवळेपणा ६ ते ७ टक्के आहे. विशेष म्हणजे ही जात सुवासिक आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या हळदीला मागणी आहे. तथापि कृषी विभागाच्या दप्तरी या हळदीची अधिकृत नोंद नव्हती. या सर्व पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने वायगाव हळदीवर संशोधन करू न १३ मे २0१४ रोजी दापोली येथे आयोजित ज्वॉइंट अँग्रोस्कोमध्ये मान्यतेसाठी ठेवले होते. जॉइंट अँग्रोस्कोने मान्यता दिल्यामुळे या हळदीचा आता अधिकृत प्रसार होणार असून, लागवडीसाठी शेतकर्‍यांना अनुदान मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. आजमितीस विदर्भातील हळदीचे क्षेत्र १२000 हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. देशात जवळपास १८५.३२ लाख हेक्टरवर हळदीचे पीक घेतले जाते. या क्षेत्रामधून जवळपास ७0१. ६६ टन हळदीचे उत्पादन मिळते. चार-पाच वर्षांपूर्वी देशातून ४२.१0 कोटीची वाळलेली हळद व ४२.५२ कोटी रुपयांची हळदीची पावडर विदेशात निर्यात करण्यात आली होती. हे प्रमाण आता वाढले आहे. मसाले पदार्थात हळदीचे प्रमाण २१.६ टक्के आहे. हळदीच्या तेलालाही मागणी असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. हे तेल हृदयातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी उपयोगी आहे. रक्तशुद्धीकरण करते, रक्तातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करण्यास उपयुक्त आहे. कफ कमी करते, रोगप्रतिकारकशक्ती वाढविते, सुजीवर प्रभावी आहे, खोकला-सर्दीवर जालीम उपाय करणारे आहे. जखम दुरुस्त करता येते.

Web Title: Vayagana haldi global market yellow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.