मॉडेल अँक्टनुसार कुलगुरूंचे सेवानवृत्तीचे वय ७0 करावे!

By admin | Published: October 7, 2015 01:58 AM2015-10-07T01:58:56+5:302015-10-07T01:58:56+5:30

कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचा शासनाला प्रस्ताव.

VC should retire 70 years of age | मॉडेल अँक्टनुसार कुलगुरूंचे सेवानवृत्तीचे वय ७0 करावे!

मॉडेल अँक्टनुसार कुलगुरूंचे सेवानवृत्तीचे वय ७0 करावे!

Next

अकोला: मॉडेल अँक्टनुसार राजस्थान, मध्यप्रदेशसह भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सर्व संस्थांमध्ये सर्व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू ंचे सेवानवृत्तीचे वय ७0 वर्षे करण्यात आले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूं चे सेवानवृत्तीचे वय ७0 करावे, यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू ंनी शासनाला प्रस्ताव सादर केला आहे; परंतु अद्याप त्यावर शासनाने निर्णय घेतला नसल्याने कार्यकाळ संपत आलेल्या कुलगुरू ंचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे. कृषी विद्यापीठाच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाले मॉडेल अँक्ट आणला आहे. या अँक्टनुसार देशातील प्रत्येक राज्यातील कृषी विद्यापीठासह भारतीय कृषी संशोधन परिषद, संलग्न सर्व संस्थांमध्ये या अँक्टची अंमलबजावणी होणे क्रमप्राप्त आहे. तथापि, महाराष्ट्र वगळता या अँक्टची इतर राज्यात अंमलबजावणी होत आहे. या अँक्टअंतर्गत विद्यापीठांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी लागते. तथापि, या राज्यात हा अँक्टच लागू झाला नसल्याने येथील कृषी विद्यापीठांना प्रतीक्षा आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांचा ३0 डिसेंबर २0१५ रोजी कार्यकाळ संपत आहे; परंतु ते वयाच्या ६३ व्या वर्षी कुलगुरू पदावरून नवृत्त होत आहेत. कृषी क्षेत्रात अत्यंत बहुमोल कामगिरी करणार्‍या या ज्येष्ठ कृषीतट्ठजाला दीड ते दोन वर्ष अगोदर सेवानवृत्त व्हावे लागत असल्याने त्यांना किमान त्यांचा ६५ वर्षांंचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा, यासंबंधीचे निवेदन शासनाला पाठवण्यात येत आहेत.

*शास्त्रज्ञांची नोकरी ६२ पर्यंंत

शासनाने कृषी शास्त्रज्ञांच्या सेवानवृत्तीचे वय ६0 वरू न ६२ केले. मॉडेल अँक्टचीच ही अंमलबजावणी असल्याने कुलगुरूंच्याबाबतीत निर्णयाला उशीर का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: VC should retire 70 years of age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.