हरभ-याची भाजी मुंबईच्या मॉलमध्ये

By admin | Published: December 9, 2014 12:02 AM2014-12-09T00:02:41+5:302014-12-09T00:02:41+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी निवडला व्यवसाय : दररोज होते लाखोंची उलाढाल

Vegetable curry of mangoes in Mumbai's mall | हरभ-याची भाजी मुंबईच्या मॉलमध्ये

हरभ-याची भाजी मुंबईच्या मॉलमध्ये

Next

बुलडाणा : पावसाअभावी यावर्षी खरिपाचा हंगाम हातचा गेला, तर रब्बी हंगामातही राम उरला नाही. ग्रामीण भागातील शेतमजुरांच्या हाताला आतापासूनच काम नाही. त्यामुळे काही मजुरांनी शक्कल लढवून हरभर्‍याची भाजी थेट मुंबईला नेऊन विकण्याचा व्यवसाय हाती घेतला आहे. या तून दोन पैसे हातात येतात व कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. जिल्ह्यातून मुंबईच्या बाजारात गेलेली हीच भाजी आकर्षक पॅकिंग होऊन मॉलमध्ये विकली जाते. यातून दररोज लाखोची उलढाल होत आहे.
रब्बी हंगामात गहू, हरभरा ही दोन पिके हमखास घेतली जातात. पाणी नसले तरी हरभरा पीकये ते. त्यामुळे कोरडवाहू जमिनीतही शेतकरी हरभरा पिक घेतात. हरभरा उगवल्यावर काही दिवसानंतर हरभर्‍याच्या झाडांचे शेंडे खुडावी लागतात. शेंडे खुडले की, झाडाच्या इतर फांद्यांची वाढ होऊन झाडे डेरेदार बनते. खुडलेले शेंडे कोवळे असल्यामुळे त्याची भाजी चवदार लागते. शेतकरी मजूर लावून ही भाजी खुडून घेतात. या हरभर्‍याच्या भाजीच्या विक्रीतून दोन पैसे जादा यावेत म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील काही महिलांनी या भाजीला मुंबईचे मार्केट दाखविले आहे. शेतकर्‍यांचा माल रात्रीच्या रेल्वेने मुंबईला न्यायचा. दिवसभर भाजीबाजारात ही भाजी विकायची आणि पुन्हा सायंकाळी रेल्वेत बसून दुसर्‍या दिवशी परत गावी यायचे. असे या व्यवसायाचे स्वरूप आहे. सध्या काही खेडे विभागातून मजूर हा व्यवसाय करीत आहेत. या भाजी व्यवसाया तून एक महिलेस दिवसाकाठी किमान हजार ते बाराशे रुपये मजुरी मिळत आहे. साधारण आठ ते पंधरा दिवसांचा हा व्यवसाय आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी हा व्यवसाय करीत असून, यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

Web Title: Vegetable curry of mangoes in Mumbai's mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.