भाजीपाल्याचे दर घसरले; शेतकरी पुन्हा चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:14 AM2020-12-27T04:14:09+5:302020-12-27T04:14:09+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त विशाल कोरडे यांचे व्याख्यान अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. ...
डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त विशाल कोरडे यांचे व्याख्यान
अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विशाल कोरडे यांनी रेडिओ व्हिजन अकोलाची स्थापना करून जनजागृतीचे विविध कार्यक्रम प्रस्तुत केले आहे. त्याच मालिकेत २७ डिसेंबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्यावर विशेष कार्यक्रम रेडिओ व्हिजन अकोलावर प्रसारित होणार आहे
पंचायत समिती परिसरात वाहनांची गर्दी
अकाेला : येथील पंचायत समितीचा परिसर आधीच कमी आहे. त्यातच या रस्त्यावर फिरत्या विक्रेत्यांसह तात्पुरते अतिक्रमण करून दुकाने थाटणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने हा रस्ता या दुकानांसाेबतच वाहनांच्या पार्किंगनेच व्यापलेला असताे. काही नेते, कार्यकर्ते या परिसरात काम नसतानाही आपली वाहने उभी करून ठेवतात, त्याचा त्रास होत आहे.
जांगीड भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
अकाेला : जिल्ह्यातील रक्तसाठ्याचा तुटवडा पाहता अकोला जिल्हा चर्मकार फोर प्लस ग्रुपतर्फे जांगीड भवन, एस. टी ऑफिससमोर कौलखेड रोड, अकोला येथे नुकत्याच झालेल्या रविदास महाराज पुण्यतिथीनिमित्त रविवार, २७ डिसेंबर राेजी रक्तदान शिबिराचे आयोजन साथ ब्लड हेल्पलाइन व संत तुकाराम महाराज बीजोत्सव सेवा समिती यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.
इच्छुक अकोलावासीयांनी रक्तदान करावे, असे आवाहन अकोला चर्मकार फोर प्लस ग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र चिमणकर यांनी केले आहे.