वाहनाची धडक, हरीण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:15 AM2021-06-25T04:15:28+5:302021-06-25T04:15:28+5:30

हातला-लोणाग्रा येथील नळ योजना कुचकामी आगर : अकोला तालुक्यातील गट ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या हातला-लोणाग्रा येथील ग्रामपंचायतची कारंजा (रम) नळ ...

Vehicle crash, deer killed | वाहनाची धडक, हरीण ठार

वाहनाची धडक, हरीण ठार

Next

हातला-लोणाग्रा येथील नळ योजना कुचकामी

आगर : अकोला तालुक्यातील गट ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या हातला-लोणाग्रा येथील ग्रामपंचायतची कारंजा (रम) नळ योजना कुचकामी ठरत असल्याने ग्रामस्थांना शेतशिवारातील विहिरीच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

कवठा येथील काँक्रिट रस्त्याचे काम थातूरमातूर

कवठा : येथे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत दलित वस्तीतील सिमेंट रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे न करता थातूरमातूर करण्यात येत आहे. या कामात खडीचा कमी वापर करण्यात आला असून, रोलरने दबाई करण्यात आली नाही. रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे करण्याची मागणी ग्रामपंचायत उपसरपंचासह सदस्यांनी केली आहे.

शिरपूर, परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित

खेट्री : पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्राचा गेल्या काही महिन्यापासून कारभार ढेपाळला असून, खेट्री, शिरपूरसह परिसरातील अनेक गावातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याकडे संबंधित वीज उपकेंद्राच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

इसापूर ग्रामपंचायतीतर्फे नदीचे खोलीकरण

तेल्हारा : इसापूर ग्रामपंचायतीच्या वतीने लोकसहभागातून नागझरी नदीचे खोलीकरण करून गाळ काढण्यात येत आहे. यावेळी सरपंच मीरा आनंद बोदडे, तलाठी गणेश डोंगरे, उपसरपंच महादेव नागे, ग्रामपंचायत सदस्य कमल घोडस्कार, जयश्री घाटोळ, तलाठी हळदकर, पोलीस पाटील बळीराम वारुळकर उपस्थित होते.

बोरगाव मंजू परिसरात वीजपुरवठा खंडित

बोरगाव मंजू : परिसरातील आजूबाजूच्या गावामध्ये वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने, शेतकऱ्यांसमोर पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

उरळ पोलिसांची दुचाकीस्वारांवर कारवाई

उरळ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उरळचे ठाणेदार वडतकार, वाहतूक शाखेचे किशोर पाटील, पद्मसिंह बैस, पंजाबराव इंगळे यांनी निमकर्दा व उरळ पोलीस स्टेशनसमोर तसेच निंबा फाटा येथे बुधवारी सायंकाळी नाकाबंदी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११ दुचाकी चालकांवर कारवाई करून दंड वसूल केला.

दानापूर येथील पथदिवे दोन महिन्यापासून बंद

दानापूरः दानापूर प्रा. आ. केंद्राच्या परिसरात असलेले हायमास्ट पथदिवे गत दोन महिन्यापासून बंद आहेत. आरोग्य केंद्रांतर्गत ३३ गावे येतात. याठिकाणी आदिवासी रुग्ण येतात. पथदिवे बंद असल्याने अंधाराचा सामना करावा लागत आहे. येथील पथदिवे सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वाडेगावात बँकेत शेतकरी व वृद्धांची गर्दी

वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील स्थानिक वाडेगाव येथील बँक व परिसरात निराधार लोकांची विविध योजनेचे मानधन घेण्यासाठी मोठी गर्दी हाेत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानंतरही नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे कोरोना नियमांचा फज्जा उडाला आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा अपव्यय

पातूर : देऊळगाव-पास्टूल ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत टेस्टिंगसाठी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, पाणी रस्त्यावर साचत असल्याने, नागरिकांना त्रास होत आहे.

देऊळगाव-पास्टूल ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या वाॅटर टेस्टिंगसाठी हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.

रेती, मातीचे अवैध उत्खनन सुरूच!

निंबा फाटा : परिसरातील मन व पूर्णा नदीतील एकाही वाळूघाटाचा लिलाव झालेला नसताना, राॅयल्टी नसताना रेती, माती व मुरुमाची अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे. वाळूचोरांची नदीपात्रात रात्रंदिवस गर्दी होत आहे. महसूल विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत आहे.

नांदखेड येथे सांडपाणी रस्त्यावर

बाळापूर: तालुक्यातील नांदखेड येथे सांडपाणी मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. तसेच नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

हातरुण-गांधीग्राम रस्त्याची दुरवस्था

हातरुण : हातरुण-गांधीग्राम रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी हातरुण परिसरातील ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून होत आहे.

कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

नया अंदुरा : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता; मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.

मूर्तिजापूर शहरात गर्दी कायम

मूर्तिजापूर : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. असे असतानाही शहरात गर्दी कायम असून, कोरोनाच्या संसर्गाची भीती वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Vehicle crash, deer killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.