भाडेतत्त्वावर वाहने; नगरसेवकांच्या आक्षेपामुळे आयुक्तांचा प्रक्रियेला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:42+5:302021-05-20T04:19:42+5:30

महापालिकेत आयुक्त, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त यासह शासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मनपा पदाधिकाऱ्यांसाठी भाडेतत्वावरील वाहनांचा वापर केला जाताे़ इंधनामध्ये ...

Vehicles on lease; Commissioner breaks process due to corporator's objection | भाडेतत्त्वावर वाहने; नगरसेवकांच्या आक्षेपामुळे आयुक्तांचा प्रक्रियेला ‘ब्रेक’

भाडेतत्त्वावर वाहने; नगरसेवकांच्या आक्षेपामुळे आयुक्तांचा प्रक्रियेला ‘ब्रेक’

Next

महापालिकेत आयुक्त, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त यासह शासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मनपा पदाधिकाऱ्यांसाठी भाडेतत्वावरील वाहनांचा वापर केला जाताे़ इंधनामध्ये चढउतार हाेत असल्याने याकरिता मनपाच्या माेटार वाहन विभागाकडून दरवर्षी निविदा प्रसिध्द केली जाते़ यंदाही या विभागाने निविदा प्रसिध्द केली असता तीन एजन्सीने अर्ज सादर केले हाेते़ यापैकी श्रीकृपा ट्रॅव्हल्सचे दर कमी असल्यामुळे माेटारवाहन विभागाने ही निविदा मंजुरीसाठी २९ एप्रिल राेजी पार पडलेल्या स्थायी समितीसमाेर सादर केली़ अर्थात, प्रशासनाने टिप्पणी सादर केल्यामुळे स्थायी समितीने प्राप्त निविदेवर चर्चा करीत मंजुरी दिली़ त्यावेळी सभेत सत्ताधारी भाजपचे सदस्य विजय इंगळे, काँग्रेसचे सदस्य पराग कांबळे, माेहम्मद इरफान आदींनी निविदा प्रक्रियेत समाविष्ट शर्ती व अटींवर आक्षेप नाेंदवला हाेता़ यादरम्यान, स्थायी समितीने तयार केलेला ठराव महापालिका आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे सादर करण्यात आला असता नगरसेवकांच्या आक्षेपामुळे या संपूर्ण प्रक्रियेला ‘ब्रेक’लावून निविदेतील अटी व शर्तींचा पुनर्विचार केला जाणार असल्याची माहिती आहे़

तीन वर्षांतील कराराची हाेणार तपासणी

मनपा प्रशासनाच्या स्तरावर वाहने भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रक्रियेत मागील तीन वर्षांच्या कराराची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे़ साहजिकच त्यावेळी व आज राेजी इंधनाचे दर नेमके काय हाेते, हे विचारात घेतले जाणार आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदाची निविदा कमी दराची आढळून आल्यास स्थायी समितीच्या ठरावावर शिक्कामाेर्तब हाेण्याची शक्यता आहे़

नगरसेवकांच्या आक्षेपाची हाेणार पडताळणी

स्थायी समितीमध्ये भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची पडताळणी केली जाणार आहे़. पडताळणीअंती प्रशासनाच्या स्तरावर याेग्य ताे निर्णय घेतला जाणार आहे़

Web Title: Vehicles on lease; Commissioner breaks process due to corporator's objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.