आॅनलाइन बदली प्रक्रियेत सूट मिळवणाऱ्या २८८ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:29 PM2018-07-24T12:29:58+5:302018-07-24T12:32:17+5:30
अकोला : विविध आजाराच्या प्रमाणपत्राच्या आधारे आॅनलाइन बदली प्रक्रियेत सूट मिळवणाऱ्या २८८ पेक्षाही अधिक शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी, तर ११९ शिक्षकांनी दिलेल्या अंतराची तपासणी केली जात आहे.
अकोला : विविध आजाराच्या प्रमाणपत्राच्या आधारे आॅनलाइन बदली प्रक्रियेत सूट मिळवणाऱ्या २८८ पेक्षाही अधिक शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी, तर ११९ शिक्षकांनी दिलेल्या अंतराची तपासणी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या दोन वैद्यकीय अधिकाºयांच्या पथकासह शिक्षण विभाग दोन दिवसात अहवाल तयार करून विभागीय आयुक्तांना सादर करणार आहे. त्याबाबतचा आदेश आयुक्त पीयूषसिंह यांनी शुक्रवारीच प्रभारी शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांना दिला होता.
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या आॅनलाइन करण्यात आल्या. त्यातील कालावधीनुसार अवघड क्षेत्र, सोप्या क्षेत्रातून बदल्या होणाºया पात्र शिक्षकांची यादी पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे असणे आवश्यक होते. पात्र असतानाही शेकडो शिक्षकांनी आॅनलाइन माहितीच भरली नाही. त्यामुळे त्यांना बदली प्रक्रियेतून सूट मिळाली, तर इतरांवर अन्याय झाला. त्यामुळे बदली प्रक्रियेतून सूट मिळालेल्या व आॅनलाइन माहिती सादर न करणाºया शिक्षकांची यादी गटशिक्षणाधिकाºयांकडून मागवण्यात आली. तसेच संवर्ग १, २ मध्ये माहिती भरून सोयीची ठिकाणे मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र, अंतराची माहिती देण्यात आली. या सगळ््या प्रकारांची चौकशी करण्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूषसिंह यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला. त्यानुसार प्रभारी शिक्षणाधिकारी अवचार यांनी शनिवारीच तसे पत्र गटशिक्षणाधिकाºयांना देत शिक्षकांना सोमवारी उपस्थित राहण्याचे बजावले.
एक व दोन संवर्गात ४०७ शिक्षक
बदली प्रक्रियेत संवर्ग १ मध्ये समावेश करून लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यात २८८ शिक्षकांनी अर्ज भरल्याची माहिती आहे. त्याचा लाभ त्यांना मिळाला. तर संवर्ग २ मध्ये ११९ शिक्षकांनी अर्ज भरले. त्यानुसार त्यांची बदली झाली. त्या सर्व शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी केली जात आहे. तसेच संवर्ग-२ अंतर्गत ३० किमीपेक्षा जास्त अंतर नसलेल्या शिक्षकांच्या अंतराची तपासणी केली जात आहे.
बदल्यांतील घोळ चौकशीत येणार पुढे
सेवाज्येष्ठ शिक्षकांनी मागितलेली गावे कनिष्ठ शिक्षकांना देण्यात आली. संवर्ग-४, संवर्ग- २ मधून अर्ज केलेल्या शिक्षिकांना ३० किमीपेक्षा जास्त अंतराची गावे मागणी केल्यानुसार कशी देण्यात आली, त्यांना ३० किमीच्या आत देणे आवश्यक होते. नियुक्ती दिनांक सारखाच असतानाही काहींना ‘खो’ देण्यात आला. एकाच शिक्षकाला दोन ठिकाणी पदस्थापना देण्याचेही पुढे येत आहे. हा घोळ आता चौकशी अहवालात पुढे येणार आहे.
दोन वैद्यकीय अधिकाºयांकडे तपासणी
संवर्ग १ चा लाभ मिळण्यासाठी शिक्षकांनी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी प्रभारी अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. भास्कर सगणे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. संवर्ग दोनमधील अंतराची पडताळणीही केली जात आहे.
माहिती न भरणारे गुलदस्त्यात
बदली प्रक्रियेत माहिती न भरता त्यापासून अलिप्त राहून लाभ मिळवणारे किती शिक्षक आहेत, याची माहिती अद्याप पुढे आली नाही.