कृषी कल्याण अभियानाच्या अंमलबजावणीची पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:31 AM2020-12-05T04:31:23+5:302020-12-05T04:31:23+5:30
वाशिम: शासनातर्फे कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत कृषी कल्याण अभियान योजना राबविली जात आहे. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणी पडताळणी करण्यात ...
वाशिम: शासनातर्फे कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत कृषी कल्याण अभियान योजना राबविली जात आहे. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणी पडताळणी करण्यात येत असून, या संदर्भात संबंधित सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी उपसंचालकांनी गुरुवारी पाठविलेल्या पत्राद्वारे दिल्या आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. यात कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाचा समावेश असून, या उपअभियांतर्गत घटक क्रमांक ६ म्हणून कृषी कल्याण अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिल्या जातो. या योजनेची प्रगती कशी आहे, अंमलबजावणी नीट होते की नाही, त्याची पडताळणी आता केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी उपसंचालकांनी संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना गुरुवारी पत्र पाठवून योजनेच्या प्रगतीचा विस्तृत अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे.