कर्जमाफीच्या अर्जांची उद्यापासून पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:41 AM2017-09-26T01:41:11+5:302017-09-26T01:41:11+5:30
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील शेतकर्यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांंची २७ स प्टेंबरपासून पडताळणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील गावागावांत होणार्या चावडी वाचनात कर्जमाफीचे अर्ज भरलेल्या शेतकर्यांच्या याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील शेतकर्यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांंची २७ स प्टेंबरपासून पडताळणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील गावागावांत होणार्या चावडी वाचनात कर्जमाफीचे अर्ज भरलेल्या शेतकर्यांच्या याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे.
सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्यांना दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्यात आले. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंंत होती. त्यानुसार जिल्हय़ातील महा ई- सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर गत २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंंत थकबाकीदार शेतकर्यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. मुदतीपर्यंंत जिल्हय़ात २ लाख ४८ हजार ४२९ शे तकर्यांच्या अर्जांंची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ३८ हजार ९६२ शेतकर्यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. कर्जमाफीसाठी शेतकर्यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांंची गावनिहाय पडताळणी २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यामध्ये गावागावांत ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या शेतकर्यांच्या याद्यांचे वाचन करण्यात करण्यात येणार आहे.
तलाठी -ग्रामसेवकांच्या नेमणुका; आज प्रशिक्षण
चावडी वाचनात कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या थकबाकीदार शेतकर्यांच्या याद्यांचे वाचन करण्याकरिता जिल्हय़ात गावनिहाय तलाठी व ग्रामसेवकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या शे तकर्यांच्या याद्यांसंदर्भात शेतकर्यांकडून दाखल होणारे आक्षे पही चावडी वाचनात निकाली काढण्यात येणार आहेत. त्यासाठी तलाठी-ग्रामसेवकांचे तालुकानिहाय प्रशिक्षण २६ स प्टेंबर रोजी घेण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली.
अर्जांंची अशी होणार पडताळणी !
गावनिहाय चावडी वाचनात कर्जमाफीसाठी पात्र व अपात्र ठरणारे शेतकरी, कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेले शे तकरी, ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्यांपैकी पुराव्याकरिता अर्ज प्रलंबित असणारे शेतकरी इत्यादी प्रकारची माहिती चावडी वाचनात अर्जांंच्या पडताळणीत देण्यात येणार आहे. त्यामध्ये कर्जमाफीसाठी अपात्र दर्शविण्यात आलेले शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचा पुरावा सादर करू शकतील.