एकाच जागेवर उभ्या बसेस सुस्थितीत; दररोज बस सुरू करून तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:16 AM2021-06-02T04:16:07+5:302021-06-02T04:16:07+5:30
जिल्ह्यातील आगार ५ विभागातील बसेस संख्या ३८३ आधीच दुष्काळ मागील वर्षभरापासून एसटी बसेस कधी सुरू, तर कधी बंद आहे. ...
जिल्ह्यातील आगार
५
विभागातील बसेस संख्या
३८३
आधीच दुष्काळ
मागील वर्षभरापासून एसटी बसेस कधी सुरू, तर कधी बंद आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
वर्षभरात लाखो रुपयांचा तोटा महामंडळाला झाला आहे, तर इतर विभागांकडील देणीही अडकली आहेत.
अत्यावश्यक सेवेसाठी १० बसेस
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १३ दिवस पूर्णत: एसटी महामंडळाची बससेवा बंद होती, तर उर्वरित वेळेला अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरू होती. यामध्ये काही दिवस १०-११ बसेस सुरू होत्या.
बस एकाच ठिकाणी उभा राहत असल्याने बसची बॅटरी डिस्चार्ज होते. त्यामुळे बस सुरू करून बंद करतात. बस चांगल्या स्थितीमध्ये राहतात. पुढील काळात वाढती प्रवासी वाहतूक पाहता बसेसची मेंटेनन्सची कामे पूर्ण केली आहेत.
- उदय पाटील, यंत्र अभियंता