पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाचे प्रवेश रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 08:36 PM2019-12-12T20:36:44+5:302019-12-12T20:37:34+5:30
पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाचे प्रवेश रखडले
ref='https://www.lokmat.com/topics/akola/'>अकोला : पश्चिम विदर्भातील शेतकºयांच्या पाल्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता यावे म्हणून तीन वर्षांपूर्वी अकोल्याला शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय मिळाले; पण जागेअभावी आतापर्यंत महाविद्यालय सुरू झाले नसल्याने पदवी अभ्यासक्र प्रवेशापासून या भागातील विद्यार्थी वंचित आहेत. पश्चिम विदर्भात शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयच नसल्याने येथील विद्यार्थ्यांना नागपूर, मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑ किंवा मुंबईला जावे लागते. इच्छा असूनही आर्थिक स्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जाता येत नाही. या पृष्ठभूमीवर शासनाने पश्चिम विदर्भात अकोला व खान्देशातील जळगाव या दोन ठिकाणी शासकीय पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात परवानगी देऊन प्रत्येकी पाच कोटी रुपये निधी मंजूर केला होता; पण गत चार वर्षांपासून केवळ जागेअभावी हे महाविद्यालय सुरू होऊ शक ले नाही. गतवर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वाशिम रोडवरील जागा ठरविण्यात आली होती. आता पुन्हा यात फेरबदल करण्यात आला असून, बाभूळगाव जहागीर येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. महाराष्टÑ (माफसू) पशू, मत्स्य व विज्ञान विद्यापीठाला या जागेचा सातबारा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम विदर्भातील अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याने त्यादृष्टीने गत चार वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात हा विचार करू न अकोला येथे या महाविद्यालयास मंजुरी देण्यात आली आहे. (व्हीसीआय) व्हेटरनरी कौन्सिल आॅफ इंडियाच्या निकषानुसार, महाविद्यालयाला जागा हवी आहे. अकोल्यात माफसूचे स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची जागा आहे, तेथे एमएससी ते पीएचडीपर्यंतचा अभ्यासक्रम शिकविला जातो. संसाधने, प्रयोगशाळा उपलब्ध आहे. कर्मचारी, शास्त्रज्ञ तसेच अधिकारी वर्गही आहे. केवळ दोन विभाग सुरू करावे लागतील, असे असताना केवळ जागा मिळत नाही, ही सबब पुढे करीत येथे पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे. आता डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेचा सातबारा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. याची पुढील प्रक्रिया शासनाला परिपत्रकानंतर सुरू होईल. ‘व्हीसीआय’च्या निकषानुसार जागा उपलब्ध झाली असून, सातबारा प्राप्त झाला आहे. शासनाचे परिपत्रक प्राप्त होताच पुढील कामाला सुरुवात होईल. ‘व्हीसीआय’च्या निकषाप्रमाणे स्नातकोत्तर संस्थेची जागा कमी असल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू केली नाही.- डॉ. व्ही. डी. अहेर,सहयोगी अधिष्ठाता,स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्था, अकोला.