व-हाडात १३८ टक्के पाऊस पण, धरणातील जलसाठा अत्यल्पच!

By admin | Published: July 19, 2016 12:33 AM2016-07-19T00:33:35+5:302016-07-19T00:33:35+5:30

पावसाचे पावणे दोन महिने संपले; आता धरणे भरण्यासाठी हवा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

Vi-bone has 138 percent of the rain but the dam's reservoir is very low! | व-हाडात १३८ टक्के पाऊस पण, धरणातील जलसाठा अत्यल्पच!

व-हाडात १३८ टक्के पाऊस पण, धरणातील जलसाठा अत्यल्पच!

Next

अकोला: पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) पाच जिल्हय़ांत यावर्षी १३८ टक्के पाऊस पडला आहे. पिकांना पोषक ठरणार्‍या या पावसामुळे शेतकरी आनंदीत आहेत; परंतु पावसाचे पावणे दोन महिने संपूनही धरणांच्या जलपातळीत पूरक वाढ झाली नाही. मागील दोन वर्षांपासून टंचाईचे चटके सहन करणार्‍या या भागातील जनतेला आता पिण्याच्या पाण्यासाठी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जून-जुलै महिन्याच्या सरासरीनुसार पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतममाळ व अमरावती या पाच जिल्हय़ांत ३00 मि.मी. पाऊस अपेक्षित होता; परंतु १८ जुलैपर्यंत यावर्षी ४१३ मि.मी. म्हणजेच १३८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या आकड्यात वाढ झालेली असली तरी धरणांच्या साठय़ात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा विस्ताराने मोठे असलेल्या या धरणात आजमितीस केवळ १0.४३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोर्णा मध्यम प्रकल्पात ७.३१ दलघमी (१२.८१ टक्के), निगरुणा ४.६१ दलघमी (१२.९८ टक्के), उमा २.0८ दलघमी (१७.८१ टक्के), वाण ५४.0३ दलघमी (६५.९३ टक्के), पोपटखेड लपा 0.३२ दलघमी (५८.२९ टक्के) तर दगडपारवा या धरणात 0.२७ दलघमी म्हणजेच २.६८ टक्के जलसाठा आहे.
बुलडाणा जिल्हय़ातील खडकपूर्णा धरण शून्य टक्के असून, नळगंगा धरणात ८.५४ दलघमी (१२.३२ टक्के), ज्ञानगंगा ८.५ दलघमी (२३.७३ टक्के), मस ७.५१ दलघमी (४९.४३ टक्के), कोराडी १.0८ दलघमी (७.१४ टक्के), पलढग 0.९१ दलघमी (१२.१२ टक्के), मन ११.४0 दलघमी (३0.९५ टक्के), पेनटाकळी ४.४५ दलघमी (७.४२)टक्के, तोरणा २.0१ दलघमी (२५.४८ टक्के), उतावळी १0.३५ दलघमी (३२.0९ टक्के) जलसाठा आजमितीस उपलब्ध आहे. वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात १५.२८, तर सोनल या प्रकल्पात 0१.४७ दलघमी जलसाठा संचयित झाला आहे.


अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणातील जलसाठय़ात वाढ होण्यासाठी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाचे सव्वा दोन महिने शिल्लक असल्याने धरणात पूरक जलसाठा संचयित होईल, अशी सर्वांना आशा आहे.
- विजय लोळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.

Web Title: Vi-bone has 138 percent of the rain but the dam's reservoir is very low!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.