स्वाइन फ्लूने घेतला दोन चिमुकल्यांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 01:08 AM2017-09-12T01:08:24+5:302017-09-12T01:09:46+5:30
अकोला: गत काही महिन्यांपासून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. जिल्हय़ात अनेकांना स्वाइन फ्लूसारख्या भयानक आजाराची बाधा झाल्याने प्राण गमवावा लागला. रविवारी आणखी आठ महिन्यांच्या बाळाचा तसेच सोमवारी अडीच वर्षाच्या मुलाचा स्वाइन फ्लू आजाराने बळी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गत काही महिन्यांपासून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. जिल्हय़ात अनेकांना स्वाइन फ्लूसारख्या भयानक आजाराची बाधा झाल्याने प्राण गमवावा लागला. रविवारी आणखी आठ महिन्यांच्या बाळाचा तसेच सोमवारी अडीच वर्षाच्या मुलाचा स्वाइन फ्लू आजाराने बळी घेतला.
गत नऊ महिन्यांपासून अकोल्यात स्वाइन फ्लूने बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. यावरून आरोग्य यंत्रणा किती ढिम्म झाली आहे, याचे प्रत्यंतर येते. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची गरज असतानाही, आरोग्य यंत्रणेने अद्यापपर्यंत कोणतीही ठोस उ पाययोजना केली नाही. परिणामी अकोलेकर नागरिकांना स्वाइन फ्लूसारख्या आजाराला बळी पडावे लागत आहे. जुने शहरातील जयहिंद चौक परिसरात राहणार्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याला पंधरा दिवसांपूर्वी ताप आला. त्याला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर डॉ क्टरांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे ये थील प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्याला स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे समोर आले. गत काही दिवसांपासून हा चिमुकला मृत्यूशी झुंज देत होता. डॉक्टरही त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते; परंतु डॉ क्टरांना त्यात यश आले नाही. अखेर रविवारी सायंकाळी चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर शुक्रवारी सर्वाेपचार रूग्णालयात भरती करण्यात आलेल्या अकोट फैलातील अडीच वर्षाच्या मुलाचा सोमवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्यांनी दिली.
स्वाइन फ्लूचे २२ बळी
स्वाइन फ्लू या अत्यंत घातक व संसर्गजन्य आजाराने जिल्हय़ातही प्रवेश केला असून, हळूहळू त्याचा विळखा घट्ट होत आहे. या आजाराने खासगी इस्पितळात उपचार घे त असलेल्या आणखी दोघांचा शनिवारी मृत्यू झाल्याने मार्च २0१७ ते ६ सप्टेंबर २0१७ या कालावधीत जिल्हय़ात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या २२ वर पोहोचली आहे. या कालावधीत १४८ संशयित रुग्ण आढळून आले असून, त्या पैकी ८२ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
- जिल्हय़ात सातत्याने स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेने उ पाययोजनेसह जनजागृती करण्याची गरज आहे; परंतु आरोग्य यंत्रणेचे अधिकारी ढिम्म झाले आहे.
- स्वाइन फ्लू आजाराने २१ बळी घेतल्यानंतर आरोग्य यंत्रणेचे अधिकारी आणखी किती बळी जाण्याची वाट पाहत आहेत, असा सवाल केला जात आहे.
लहान मुलांना डेंग्यूचा धोका
हा आजार कोणालाही होऊ शकतो. मात्र, प्रामुख्याने लहान मुलांना डेंग्यू संसर्गाचा धोका अधिक असतो.
लक्षणे :
डेंग्यूची लक्षणे ही इतर विषाणूजन्य तापासारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळय़ांच्या मागे दुखणे, अशी लक्षणे आढळतात.
रक्तस्त्रावित डेंग्यू !
‘रक्तस्त्रावित डेंग्यू’ ही या आजाराची गंभीर अवस्था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते तर डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. सुरुवातीच्या काही दिवसांत याची लक्षणे साध्या डेंग्यू सारखी असतात. क्वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात. रक्तस्त्रावित डेंग्यू तापाचे निदान अंगावरील दर्शनीय भागावर आलेल्या पुरळांवरुन केले जाऊ शकते.