पायाभूत चाचणीत विदर्भाला ‘सी ग्रेड’

By admin | Published: December 29, 2015 02:13 AM2015-12-29T02:13:27+5:302015-12-29T02:13:27+5:30

‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’चा धक्कादायक निकाल.

Vidarbha 'C grade' in basic test | पायाभूत चाचणीत विदर्भाला ‘सी ग्रेड’

पायाभूत चाचणीत विदर्भाला ‘सी ग्रेड’

Next

प्रवीण खेते / अकोला : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीचा धक्कादायक निकाल समोर आला असून, यामध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांना ह्यसी ग्रेडह्ण मिळाला आहे. पायाभूत चाचणीच्या माध्यमातून समोर आलेल्या अप्रगत विद्यार्थ्यांंच्या गुणवत्तावाढीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांनी यानिमित्त मांडले. राज्यातील अप्रगत विद्यार्थ्यांंची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनामार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ऑक्टोबरमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंंतच्या विद्यार्थ्यांंची प्रथम भाषा व गणित या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आली होती. गत महिनाभरापासून या चाचणीचा जिल्हानिहाय निकाल ह्यसरलह्ण प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होती. सरल प्रणालीने पायाभूत चाचणीचा निकाल नुकताच जाहीर केला. तो धक्कादायक आहे. जिल्हानिहाय समोर आलेल्या या निकालात प्रथम भाषा आणि गणित विषयात बहुतांश विद्यार्थ्यांंना ह्यसी ग्रेडह्ण, तर काहींना ह्यबी ग्रेडह्ण मिळाल्याचे स्पष्ट होते. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना प्रथम भाषा व गणित विषयात ह्यसी ग्रेडह्ण मिळाला आहे. या निकालाने राज्यातील विद्यार्थ्यांंची गुणवत्ता दर्शविली असून, त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे मत शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. संकलित मूल्यमापनाची चाचणी रद्द एकीकडे पायाभूत चाचणीचा धक्कादायक निकाल समोर आला असताना, विद्यार्थ्यांंच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक ठरणार्‍या ह्यसंकलित मूल्यमापनाह्णची चाचणी रद्द करण्यात आली आहे. ही चाचणी पायाभूत चाचणीनंतर विद्यार्थ्यांंच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या प्रयत्नांवर आधारित होती. त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत तीन ऐवजी आता दोनच चाचण्या घेण्यात येणार असून, शैक्षणिक सत्राच्या अखेरीस शेवटची चाचणी घेण्यात येणार आहे.

Web Title: Vidarbha 'C grade' in basic test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.