'विदर्भ चेंबर' करणार १९ मार्चला चिनी बनावटीच्या वस्तूंची होळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 01:00 PM2019-03-11T13:00:35+5:302019-03-11T13:00:43+5:30
अकोला: विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने आगामी १९ मार्च रोजी चिन निर्मित वस्तूंची होळी करणार आहे.
अकोला: विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने आगामी १९ मार्च रोजी चिन निर्मित वस्तूंची होळी करणार आहे. त्यासाठी व्यापारी-उद्योजकांनी जनजागृती केली असून, चायनाच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या उद्देशाने ही प्रतीकात्मक होळी केली जात आहे. राष्ट्रीय ‘कॅट’चे अध्यक्ष बी. सी. भरतीया आणि सचिव अशोक डालमिया यांच्या पुढाकारात ही मोहीम सुरू झाली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान देशात अंतर्गत तणाव निर्माण झालेला आहे. चीनची संपूर्ण अर्थव्यवस्था भारताच्या बाजारपेठांवर अवलंबून असताना चीनने पाकिस्तानला पाठिंबा देण्याचा प्रयोग चालविला आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या चिनी बनावटीच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार घातल्यास पाकिस्तान आणि चीनला धडा शिकविता येईल. या विचारधारेला घेऊन ‘कॅट’ने विदर्भ चेंबरच्या माध्यमातून १९ मार्च रोजी देशभरात चिनी वस्तूंची होळी करण्याचे आवाहन केले आहे. विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सने या होळीसाठी काही विशेष निर्देशही व्यापाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे होळीसह,वस्तूंवर व्यापारीच मोठ्या प्रमाणात बहिष्कार घालणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत चिन निर्मित वस्तू पोहोचणार नाहीत. दरवर्षी होळीच्या निमित्ताने चिनच्या पिचकाºया आणि विविध वस्तू भारताच्या बाजारपेठेत येत असतात. यंदाही त्या वस्तू बाजारपेठेत येण्याची शक्यता असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्याची मोहीम ‘कॅट’ने सुरू केली आहे.