विदर्भात चंद्रपूर येथे २७ मि.मी. पाऊस!

By admin | Published: June 25, 2017 08:06 AM2017-06-25T08:06:17+5:302017-06-25T08:06:17+5:30

अकोला ३.३ मि.मी.; दमदार पावसाची प्रतीक्षा.

Vidarbha Chandrapur is 27 mm long Rain! | विदर्भात चंद्रपूर येथे २७ मि.मी. पाऊस!

विदर्भात चंद्रपूर येथे २७ मि.मी. पाऊस!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भात पावसाळी वातावरण तयार झाले असून, मागील तीन दिवसांपासून ठिकठिकाणी पाऊस होत आहे. मागील चोवीस तासांत सर्वाधिक पावसाची नोंद चंद्रपूर येथे २७.0 मि.मी. करण्यात आली आहे. अकोल्यात ३.३ मि.मी. पाऊस झाला आहे.
मागील तीन दिवसांपासून विदर्भात पावसाचे वातावरण तयार झाले आहे. मान्सूनचे वारे गोंदिया आणि भंडारा जिल्हय़ात पोहोचल्याचे संकेत आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या नैऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये पुढे गेला आहे. सौराष्ट्रचा काही भाग, गुजरातचा काही भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ उर्वरित भाग, पश्‍चिम मध्य प्रदेशचा काही भाग आणि पूर्व मध्य काही भाग व्यापत आहे. मान्सूनची उत्तरी सीमा (एनएलएम) लॅटमधून उत्तीर्ण होते. त्यामुळे द्वारका, खंडवा, बैतुल, मांडला, पटना आदी भागांत मान्सूनचे वारे वाहत आहेत.
दरम्यान, मागील चोवीस तासांत अमरावती येथे ३.४ मि.मी. पाऊस झाला असून, ब्रम्हपुरी ५.६ तर नागपूूर येथे ११.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, वर्धा येथे १.६ मि.मी. पावसाची नागपूर वेधशाळेने नोंद केली आहे.
- अकोल्यात तुरळक पाऊस
अकोला जिल्हय़ात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून, जिल्ह्यातील काही मोजक्या भागात हजेरी लावली आहे. पावसाचे स्वरू प हे सार्वत्रिक नसल्याने शेतकर्‍यांनी पेरणी थांबविलीआहे; परंतु ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, तेथे पडणारा हा पाऊस पिकांना दिलासादायक ठरत आहे. पिकांना हा पाऊस संजीवनी ठरला आहे. मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी शेतकर्‍यांनी केलेली आहे, त्यामुळे शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Vidarbha Chandrapur is 27 mm long Rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.