विदर्भातील प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्याबाबत विचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:33 AM2019-02-09T10:33:33+5:302019-02-09T10:33:37+5:30

अकोला: विदर्भातील उन्हाळा अत्यंत कडक उष्णतेचा असतो. उन्हाच्या तीव्रतेचा चिमुकल्या मुलांना त्रास होऊ नये, यासाठी १ मार्चपासून विदर्भातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी ७ फेब्रुवारी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे.

Vidarbha elementary school from 1st March in morning session! | विदर्भातील प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्याबाबत विचार!

विदर्भातील प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्याबाबत विचार!

Next

अकोला: विदर्भातील उन्हाळा अत्यंत कडक उष्णतेचा असतो. उन्हाच्या तीव्रतेचा चिमुकल्या मुलांना त्रास होऊ नये, यासाठी १ मार्चपासून विदर्भातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी ७ फेब्रुवारी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान राज्यात सर्वाधिक असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चंद्रपूर, नागपूर, वर्धा, खामगाव, अकोला या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद होते. तसेच उन्हाळ्यात पाण्याचीसुद्धा तीव्र टंचाई जाणवते. त्यामुळे विदर्भातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी अ.भा. उर्दू शिक्षक संघटनेच्यावतीने(अमरावती)प्राथमिक शिक्षण संचालकांकडे करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षक संचालक चव्हाण यांनी, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणात होऊ नये, यासाठी प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावा, असे पत्र त्यांनी शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवांना दिले आहे. त्यानुसार शासन स्तरावर विदर्भातील प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा विचार सुरू आहे.

Web Title: Vidarbha elementary school from 1st March in morning session!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.