विदर्भात येत्या ४८ तासात गारपीटीची शक्यता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:59 PM2018-02-10T12:59:04+5:302018-02-10T13:02:50+5:30
अकोला : येत्या ४८ तासात विदर्भात गारपीटीची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
अकोला : येत्या ४८ तासात विदर्भात गारपीटीची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. सद्या खरीप हंगामातील तूर आणि रब्बी हंगामातील हरभरा काढणीला सुरू वात झाली पण दोन दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, मेघगर्जनेसह गारपीटीची शक्यता वर्तविल्याने शेतकºयांची चिंता वाढली.
मागील ३६ तासात राज्यातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झाली असून, उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून, १२ फेब्रुवारीला विदर्भात बºयाच ठिकाणी,मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराराष्ट्र त तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १३ फेब्रुवारीला मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह तर राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ११ फेब्रुवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा तर १२ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्टÑ, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीटीची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.